शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चाफ्याच्या पाड्याची हरियाणाच्या अधिकाऱ्यांना मोहिनी

By admin | Updated: May 28, 2017 00:23 IST

निकवेल : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाफ्याचा पाडा (देवपूर) गावाला हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनिकवेल : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाफ्याचा पाडा  (देवपूर) गावाला हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. चाफ्याचा पाडा हे १०० टक्के आदिवासी गाव असून, आदर्श गाव म्हणून शासनाचे अनेक पुरस्कार या गावाला प्राप्त झाले आहेत. त्या निमित्त या गावाने आदर्श निर्माण केल्याने महाराष्ट्रसह इतर राज्यातील अधिकारी व सरपंच या गावाला भेटी देण्यासाठी येत आहेत. नुकताच हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या वतीने अधिकाऱ्यानी दौरा करून गावाचे कौतुक केले. यावेळी हरियाणा राज्यातील पानिपतचे अतिरिक्त उपायुक्त अजय तोमर, भीमानी जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त गिरेंद्र खतारवाडा, कुरु क्षेत्र जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त रजिय मेहता, कर्नल जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त प्रियांका सोनिये तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शमशेर, रोदर गौरव, पानिपत, संदेश शर्मा, राजेश छात्रोली, राज कुमाररोदर, संजू कुमार, धर्मवीर सोनिपत्र, दिनेश वर्मा, नरेंद्र कुमार, रायपुर राणे, वर्ल्ड बँकेचे मुख्य अधिकारी अमित विश्वास व आदि अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार चाफ्याचा पाडा गावातील ग्रामस्थांनी केला. हरियाणा राज्यात या गावाचा आदर्श ठेवून हरियाणा राज्यामध्ये चाफ्याचा पाडा गावासारखे विकासकामे करून एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.  दौऱ्यामध्ये हरियाणा राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिरिक्त उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरोबरच गटविकास अधिकारी, सरपंच असे पथक तयार करून आदर्श गाव चाफ्याचा पाडा गावाला भेट दिली. ग्रामस्थांनी सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले. चाफ्याचा पाडा गावाच्या वतीने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच काशीबाई बागुल, हिरामण बागुल, शांताराम बागुल, लक्ष्मण गांगुर्डे, नंदू गायकवाड, शंकर बागुल, वामन बागुल, बागलाण पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, ग्रामसेवक एस.आर. देवरे, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, विकास वाघ, शाळेचे मुख्याध्यापक रमेश मोरे व शिक्षक दिलीप बिरारी, प्रभाकर बागुल, कैलास गांगुर्डे, वामन जगताप, अशोक बागुल, संजय बागुल, अंगणवाडी कार्यकर्ता कल्पना गायकवाड, ममता गायकवाड, पुष्पा चिंचोरे, सपना जगताप, रंजना देशमुख आदि ग्रामस्थ उपस्थित होते.