शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:05 IST

२४ कोटींचे रस्ते : आदिवासी विकास विभागाला चपराकलोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आदिवासी उपयोजनेतील निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून जिल्ह्णातील १४२ रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली असून, सदरचा निधी परस्पर वर्ग करणाºया जिल्हाधिकाºयांच्या चौकशीचा आग्रह धरणाºया आदिवासी विकास विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

२४ कोटींचे रस्ते : आदिवासी विकास विभागाला चपराकलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आदिवासी उपयोजनेतील निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून जिल्ह्णातील १४२ रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली असून, सदरचा निधी परस्पर वर्ग करणाºया जिल्हाधिकाºयांच्या चौकशीचा आग्रह धरणाºया आदिवासी विकास विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा नियोजन समितीच्या या निधीच्या परस्पर वळविण्याच्या प्रश्नावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. आदिवासी विकास विभागाच्या उपयोजनेच्या वार्षिक नियोजनात जवळपास १४ कोटी रुपयांची बचत झाल्याने या निधीबरोबरच आणखी काही निधीची भर टाकून जवळपास २४ कोटी रुपयांची तरतूद आदिवासी भागातील रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी करण्यात आली होती. आदिवासी विकास विभागाची रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जातात, परंतु सदरचा निधी मुदतीत खर्च होण्याविषयी साशंकता निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आलेला हा निधी व रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.यासंदर्भात काही संबंधित ठेकेदारांनी आदिवासी विकास विभागाकडे तक्रारी केल्याने आदिवासी विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांनी जिल्हाधिकाºयांनी निधी वर्ग करण्याबाबत दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची तसेच आदिवासी विकास विभागाचा निधी परस्पर वळता करण्याची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते. आदिवासी विकास विभागाच्या या पत्रामुळे महसूल विरुद्ध आदिवासी विकास विभाग असा वाद निर्माण होऊन संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमधूनही वाचा फोडण्यात आल्याने जिल्हाधिकाºयांनी आपले म्हणणे शासनास सादर केले. त्यावर दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांचे म्हणणे रास्त ठरविले व आदिवासी विकास विभागाचे उपसचिव शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचे तसेच चौकशी करण्याचे दिलेल्या आदेशालाही स्थगिती दिली आहे.पालघरला चालते मग...आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्णात नियोजन समितीने अशाच प्रकारे आदिवासी विकास विभागाचा निधी वळविण्यात आलेला असताना आदिवासी विकास विभागाने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र नाशिकमध्ये वेगळा न्याय लावल्याबद्दल आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाबाबतच संशय घेतला जात आहे. काही ठराविक ठेकेदारांना बळी पडूनच आदिवासी विकास विभागाने कायदेशीर बाबी न तपासता घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीच्आदिवासी विकास विभागाचा निधी जिल्हा परिषदेकडे वळविण्याच्या निर्णयावरून जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाबाबत वाद उपस्थित झाल्यानंतर सुमारे २४ कोटी रुपये खर्चाच्या या १४२ रस्त्यांच्या कामांची सत्यता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांशी रस्ते हे कागदावरच राहून त्यातील पैसे हडप केले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी या सर्व कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण केल्यानंतरच ठेकेदारांना कामाची देयके अदा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठेकेदारांच्या पोटात गोळा उठला आहे.