नाशिक : पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, पालकमंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक मंत्री हजर राहणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळा नागरी समितीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले सिंहस्थ हा सर्व नाशिककरांचा असून, त्यासाठी सर्व नागरिकांनी घरच्याप्रमाणे पुढाकार घेतला पाहिजे. ध्वजारोहणाचे आणि त्याच्या शोभायात्रेचे कार्य उत्तमरीत्या पार पडेल, त्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
ध्वजारोहणाला येणार मुख्यमंत्री
By admin | Updated: July 10, 2015 23:26 IST