शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:59 IST

: भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य दिल्लीतील एका बैठकीत केल्यानंतर त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या गोटात नाराजी असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘अबकी बार २२० के पार’ असे म्हणत मुख्यमंत्री भाजपचाच होईल, अशी ठाम भूमिका नाशिकमध्ये मांडली.

नाशिक : भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य दिल्लीतील एका बैठकीत केल्यानंतर त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या गोटात नाराजी असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘अबकी बार २२० के पार’ असे म्हणत मुख्यमंत्री भाजपचाच होईल, अशी ठाम भूमिका नाशिकमध्ये मांडली. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने आपली नाराजी कुठेही स्पष्टपणे मांडली नसल्याने आम्ही आता ‘साथ-साथ आहोत’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. आता महाराष्टÑात निवडणुका होऊ घातल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत बैठक झाली.  त्यावेळी शहा यांनी महाराष्टÑात भाजपाचाच मुख्यमंत्री हवा, असे व्यक्तव्य केल्याने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असल्याचे सूचक विधान केले.शिवसेनेने उघडपणे कुठेही नाराजी व्यक्त केलेली नसल्याने आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभेतही सोबत आहोत. शिवसेनेचे उमेदवार जेथे असतील ते निवडणून आणण्याची जबाबदारी भाजपाची असेल, असे आदेश शहा यांनीही दिले आहेत. युतीतील मित्रपक्षांचेही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे युतीत कोणताही बेबनाव नाही. सेना आणि भाजपा साथ-साथ असून ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार’ याप्रमाणे उभयतांची भूमिका असल्याचा पुनरुच्चारही मुनगंटीवर यांनी केला.अद्याप जागावाटप झालेले नाही, बैठकीत चर्चेतून काही निर्णय होतील. लोकसभेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जागांमुळे जनतेच्या भावना लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकही तितकीच गांभीर्याने आणि ‘अब की बार २२० के पार’ याच न्यायाने लढल्या जातील, असेही मुनगंटीवार म्हणाले.भाजपा-सेनेची मैत्री पक्की असल्याने नाराजी कुठेही नाही. शिवसेनेनेदेखील नाराजी जाहीर केलेली नाही. आगामी विधानसभा निवडणूक युतीतील पक्ष मोठ्या ताकदीने लढतील.काका-पुतण्यामध्ये एकमत होण्याच्या दिल्या शुभेच्छाराष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला, तर अजित पवार यांनी काही ठिकाणी राष्टÑवादीचेही उमेदवार निवडून आल्याचे राष्टÑवादीच्या मेळाव्यात विधान केल्याने काका-पुतण्यांमधील विसंवाद पुन्हा समोर आला. याविषयी मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी काका-पुतण्यांमध्ये एकमत होवो, अशा राष्ट्रवादीला शुभेच्छा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाElectionनिवडणूक