शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

मुख्यमंत्रीच रिमोट कंट्रोलने महापालिकेचा कारभार हाकत

By admin | Updated: April 5, 2015 01:04 IST

मुख्यमंत्रीच रिमोट कंट्रोलने महापालिकेचा कारभार हाकत

नाशिक : महापालिकेत नियुक्त झालेले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने आले आहेत. साहजिकच नाशिक महापालिकेचा कारभार आता मनसेच्या ताब्यात राहिलेला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या हाती गेला आहे. मुख्यमंत्रीच रिमोट कंट्रोलने महापालिकेचा कारभार हाकत आहे, असा आरोप कॉँग्रेसने केला आहे. येत्या महासभेत घंटागाडी ठेक्यापासून ते घरपट्टीच्या वाढीपर्यंतच्या सर्वच प्रस्तावांना विरोध करण्यात येईल आणि तो मंजुरीचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.पक्षाचे शहराध्यक्ष शरद अहेर आणि गटनेता उत्तमराव कांबळे यांच्यासह अन्य नेत्यांची यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. महापालिकेत आयुक्त नियुक्त केल्यानंतर गेल्या वर्षीच मुख्यमंत्र्यांनी आपणच डॉ. गेडाम यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले होते त्याची प्रतिक्रिया आता उमटली आहे.महापालिकेची येत्या सोमवारी (दि.६) महासभा होणार आहे. त्यासंदर्भात शनिवारी पक्ष बैठक झाली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे यांच्यासह अन्य अनेक नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत महासभेत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यात आयुक्तांनी सादर केलेले अनेक प्रस्ताव आक्षेपार्ह आहेत. हे प्रस्ताव महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीला धरून नाही. त्यामुळे त्यास विरोध करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानादेखील तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून दहा वर्षांसाठी घंटागाडी चालविण्याचा ठेका देण्याचा प्रस्ताव अनाकलनीय आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यातून आयुक्तांची भूमिका स्पष्ट होत नाही. अशा प्रकारच्या प्रस्तावामुळे नागरिकांवर कराचा बोजा वाढणार असल्याने त्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. घरपट्टी आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, ती वसूल न करता अकारण नागरिकांवर बोजा टाकला जात आहे. मुकणे धरणाचा शंभर टक्के खर्च राज्यशासनाने करावा, अशा मागण्या करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सोयीनुसार महापालिकेत प्रस्ताव मांडले गेल्यास आणि ते मंजूर केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे सोमवारची महासभा गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)