शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

मुख्यमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन

By admin | Updated: January 18, 2016 22:03 IST

कळवण : ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी निधीची मागणी

कळवण : तालुक्यातील ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाची गळती प्रतिबंधक दुरुस्ती व सुधारणा कामास राज्य शासनाने सात कोटी १२ लाख रु पयांची प्रशासकीय मान्यता दिली असून, दोन वर्षांपूर्वी कामाची निविदा काढून कामासाठी ठेकेदार निश्चित करूनदेखील वर्षभरापासून धरणाचे काम ठप्प झाल्याने ओतूरसह २० गावांतील शेतकरी बांधवामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व शासन निर्देशानुसार दोन वर्षांत काम पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. एक्स्प्रेस फीडरअभावी भेंडीचे १३ कोटींचे पणनचे कांदा, डाळींब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र धूळ खात पडून असल्याने एक्स्प्रेस फीडर बसवून वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा व शेतकरी सहकारी संघाला कांदा निर्यात केंद्र चालविण्यास द्यावे, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार व भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, संचालक राजेंद्रनाथ पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कळवण येथे नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण लक्ष घालून मुख्याधिकारीसह प्रमुख शासकीय यंत्रणेची नगरपंचायतमध्ये तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्यासह गटनेते, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)