शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उदासीन : पालकमंत्री सुस्त

By admin | Updated: May 17, 2015 23:52 IST

‘मांजरपाडा’पुढे अडचणींचा डोंगर

येवला : दुष्काळी येवला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा-१ प्रकल्पाच्या सुधारीत ४५४ कोटींच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता न दिल्याने व मागील शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यते अभावी अखर्चित राहिल्याने आणि २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळवल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे काम ठप्प झाले असल्याचे वृत्त आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे.सुरगाणा तालुक्यातील केम पर्वत रांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. मात्र त्याच वेळी कागदावरही अस्तित्वात नसलेल्या मांजरपाडा-२ साठी मात्र सर्व निधी देऊ, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस विधानसभेत सांगत आहेत. जलसंपदामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा-१ वळण योजनेबद्दल सोयिस्कर मौन बाळगले आहे. या योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ४५४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच मागच्या सरकारने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यातील २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळविला आहे. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आमदार भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटीतून हा प्रश्न मांडला असून, विधी मंडळातही अनेक वेळा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. असे असूनही शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ केली आहे. शासनाच्या दप्तर दिरंगाई मुळे योजनेचा खर्च अजुन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)