शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

By admin | Updated: August 12, 2014 01:17 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

 हरसूल : हरसूलजवळील तोरंगण या लहानशा खेड्यात सायंकाळी अचानक लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. हनुमान मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांसोबत सहज चर्चा करायची आहे, असे सांगत गाडीमधील साहेबांनी गावाच्या समस्यांना हात घालत साऱ्यांना बोलते केले. गप्पा सुरूझाल्यावर अचानक त्यांच्या पाठीमागून शासकीय वाहने व शासकीय कर्मचारी गावात येऊ लागले. थोड्याच वेळात ग्रामसेवक व सरपंच तसेच ग्रामस्थांना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी सुखदेव बनकर आपल्या गावात भेटीला आले आहे याचा उलगडा झाला. मंदिर परिसरात गर्दी आणखी वाढली. बनकर यांनी दिलेला हा सुखद धक्का गावकऱ्यांना समाधान देऊन गेला.यावेळी गावकऱ्यांनीही बनकर यांच्याशी दिलखुलास चर्चा करून आपल्या समस्या मांडल्या . सरपंच रामदास बोरसे यांनी बनकर यांचे स्वागत केले. ग्रामस्थांनी रोजगार हमीमध्ये मजुरी कमी मिळणे, घरकुल योजनेसाठी ग्रामसेवक, सरपंच यांच्या कडून सहकार्य न मिळणे, मर्जीतल्यांनाच घरकुल मंजूर होणे, कृषी विभागाकडून सहकार्य नसणे, ठराविक राजकीय व्यक्तींना कृषी विभागाच्या योजनेचा लाभ देणे, व्यायाम शाळेतील साहित्याचा अभाव, काम करत नसलेली शालेय समिती गैरहजर रहाणारे शिक्षक आदि समस्यांचा पाढाच वाचला. यावर मुख्य अधिकारी बनकर यांनी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर, त्र्यंबक गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला जाखालेकर, रामदास बोरसे राहुल बोरसे, अंबादास बोरसे, पावन बोरसे, अमृत पेंढार, निवृत्ती हिरकुड, चिंतामण गावित आदि उपस्थित होते. (वार्ताहर)