पंचवटी : चैत्र छटपर्वनिमित्त शेकडो उत्तर भारतीय गंगाघाटावर दाखल झाले असून, गोदाकाठावर छटपूजेसाठी रविवारी सायंकाळी मोठी गर्दी केली होती. वर्षातून कार्तिक छटपर्व व चैत्र छटपर्व असे दोन पर्व येतात. रविवारी परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेल्या उत्तर भारतीय भाविकांनी नदीकाठी सुपात विविध प्रकारची फळे ठेवून तसेच उसाचे पंडाल व नवीन कपडे मांडून पूजा मांडली होती. सूर्योदयाला पाण्यात उतरून सूर्यदेवतेचे पूजन करण्याची प्रथा असल्याने शेकडो महिला व पुरुष भाविक नदीकाठी जमले होते.छटपर्वच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य दाखवून पूजा केली जाते. परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी रात्रभर पूजन केले. या छटपर्वात सूर्य देवतेचे पूजन केल्याने शारीरिक दोष दूर होतात, तसेच गोदावरी पूजनाने पुण्य प्राप्ती होते, असे मानले जात असल्याने वर्षातून दोन वेळा येणाऱ्या छटपर्वात उत्तर भारतीय बांधव नदीकाठी पूजन करून सूर्यदेवतेची उपासना करून पूजन करतात. या छटपर्वाच्या दिवशी उपवास करतात.
गोदाकाठी उत्तर भारतीयांचे छटपूजन
By admin | Updated: April 3, 2017 01:44 IST