शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जिल्ह्यात छत्रपतींचा जयजयकार

By admin | Updated: March 16, 2017 22:56 IST

मिरवणूक : मोटारसायकल रॅली, रक्तदान शिबिर, दुग्धाभिषेक आदिंसह विविध उपक्रम

नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करीत शेकडो शिवप्रेमींनी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला. शिवजयंतीनिमित्त शहरातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीच्या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मंडळांनी ‘डीजे’ला फाटा दिल्याने केवळ ढोल-ताशांचा गजर कानी पडला.चांदवडला मिरवणूकयेथील नगरपरिषद कार्यालयापासून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुसज्ज अशा दोन चित्ररथांतून मिरवणूक काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले कलावंत होते. मिरवणुकीत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह होता. तीन ढोलपथके, विविध चित्ररथ, डीजे पथकाने मिरवणुकीचे आकर्षण वाढवले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय दादा पाटील, नगरसेवक जगन्नाथ राऊत, दीपक शिरसाठ, बाळू वाघ, संदीप उगले, सचिन (गुड्डू) खैरनार, सागर बर्वे, राहुल हांडगे, बाळासाहेब वाघ, गणेश पारवे, विलास पवार, सुदेश (शंभू) खैरे, गौरव कोतवाल, नितीन फंगाळ, नितीन खैरनार, दीपक गुरव, गणुकाका सोनवणे, सचिन शिंदे, डॉ. नीलेश ठाकरे, नीलेश आचलिया, शांताराम भापकर, योगेश शिंदे, गणेश लहरे, उमेश दांड, संकेत राऊत, हेमंत खरोटे, विशाल जाधव, योगेश आहिरे, संघटक दीपक शिरसाठ, रवि बडोदे, खजिनदार मुकेश कोतवाल, महेश खंदारे, सदस्य सुनील बागुल, धनंजय पाटील, बापू अहेरराव, धीरज संकलेचा, अजहर नाईक, काशिद शेख, अमोल थोरे, विशाल ललवाणी, प्रशांत ठाकरे आदि नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला. संत गाडगेबाबा चौकात मिरवणुकीची ॅसांगता झाली.जे. आर .गुंजाळ विद्यालय चांदवड येथील जे. आर. गुंजाळ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची ३८७ वी जयंती उत्साहात साजरी झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य वाय. एन. देवरे होते. प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक एस. टी. पगार यांनी केले. यावेळी उपशिक्षक पी. डी. अहेर, डी. एम. न्याहारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्र्रमास के. के. वाघचौरे, आर. के. शेळके, एस. एस. खुटे, एस. आर. कापडणे, श्रीमती एन. एस. रौंदळ, एस. बी. चव्हाण, पोमणार, एस. टी. हांडगे, बी. आर. गायकवाड, पी. डी. गायकवाड, बी. एस. पवार, मिलिंद पवार व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. पी. कुंभार्डे यांनी केले. जे. एस. शिंदे यांनी आभार मानले. अभियांत्रिकी महाविद्यालय चांदवड येथील एस. एन. जे. बी. संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, विभागप्रमुख प्रा. वाय. एल. भिरुड यांनी केले. यावेळी तृतीय वर्ष स्थापत्य विभागातील प्रदीप वाळुंज याचे शिवचरित्रावर भाषण झाले. सूत्रसंचालन अंकिता चोभारकर हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन पी. एम. येवले, उमेश महाले, गौरव वाघ, आयुषी चौधरी, बबलू जगताप, मधुर गुजराथी व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास सर्व शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. देवळा शहरात मिरवणूकदेवळा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात भगवे ध्वज लावण्यात आल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. येथील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगरपंचायतीच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रांगणात सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोक अहेर, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, प्रदीप अहेर, रोशन अलिटकर, सामाजिक कार्यकर्ते संजय अहेर, अशोक अहेर, पंकज अहेर, दिलीप अहेर, अशोक अहेर, किरण अहेर, पप्पू हिरे, चेतन अहेर, प्रफुल्ल अहेर, भूषण अहेर, रोशन मोरे, संदेश निकम, नीलेश निकम, संदीप मेधने, मनोज अहेर, सुनील अहेर आदि उपस्थित होते. (लोकमत चमू)