वणी : पंचक्रोशीतील जागृत जगदंबा देवी मंदिरात चैत्र यात्रोत्सवास प्रारंभ झाला. आज पहाटे ५ वाजता देवीला दुग्धाभिषेक पंचामृत स्नान घालण्यात आले. देवीची विशेष सजावट करण्यात आली होती. नऊवार महावस्त्र, एक मीटर खणाची चोळी, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ, कानात कर्णफुले, कपाळावर चंद्रकोर, शिरावर चांदीची छत्री, शिरकमल फुलांचे सुशोभीकरण यामुळे जगदंबेचे रूप अधिक खुलून दिसत होते. देवीला सातवारांच्या सात साड्या प्रतिदिन शेंदुरलेपन अशा विधींबरोबर दररोज पुरणाचा नैवेद्य, सकाळी, सायंकाळी आरती असे नियोजन आहे. तसेच सायंकाळी जगदंबा देवी मंदिरापासून देवीचा पितळी मुखवटा पालखीत ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. थोरात-देशमुख समाजाचा मान असणाऱ्या पालखीतील देवीचे ठिकठिकाणी विधिवत पूजन करण्यात येते. यात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातून भाविकांची व नवस फेडणाऱ्यांची हजेरी लागते. चैत्र पौर्णिमा ते अमावास्या अशा पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिराचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था यास अग्रक्रम देण्यात आला असून, जगदंबादेवी कार्यकारी मंडळ, ग्रामपालिका, ग्रामस्थ वणी पोलीस यात्रोत्सव यशस्
जगदंबा देवी मंदिरात चैत्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: April 6, 2015 00:53 IST