नाशिक : अंबड येथील उद्योगांमधून निघणाºया घातक केमिकलयुक्त व दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील नाल्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे नासर्डी नदीच्या प्रदूषणातही त्यामुळे चिंताजनक वाढ झाली आहे. दोषी कंपनी व्यवस्थापनाविरोधात तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. अंबड एमआयडीसी येथील लहान-मोठ्या विविध उद्योगांनी त्यांच्या औद्योगिक वापरातून निघणारे घातक केमिकलयुक्त व दूषित सांडपाणी पाइपलाइनव्दारे मनपाच्या पावसाळी गटारींना जोडण्यात आले आहे. गटारींमधून सदर सांडपाणी मानवी आरोग्य व अमूल्य जनसंपत्तीला हानी पोचविणारे आहे. सदर दूषित पाणी चुंचाळे, कानओहोळनाला, विहिरी, कू पनलिकांच्या नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये उतरत आहे. त्याचबरोबरच रसायनयुक्त घातक व दूषित या सांडपाण्यामुळे नासर्डी नदीच्या प्रदूषणात मोठीच वाढ झाली आहे. परिसरातील कृ षी उत्पादनांवर विपरीत परिणाम करणाºया या घातक व दूषित सांडपाण्याच्या सेवनामुळे नागरिक मोठ्या संख्येने जलजन्य आजारांना बळी पडू लागले आहेत.
नाशिकच्या नासर्डी नदीत उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:06 IST
नाशिक : अंबड येथील उद्योगांमधून निघणाºया घातक केमिकलयुक्त व दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील नाल्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे नासर्डी नदीच्या प्रदूषणातही त्यामुळे चिंताजनक वाढ झाली आहे. दोषी कंपनी व्यवस्थापनाविरोधात तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. अंबड एमआयडीसी येथील लहान-मोठ्या विविध उद्योगांनी त्यांच्या औद्योगिक ...
नाशिकच्या नासर्डी नदीत उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी
ठळक मुद्देप्रदूषणात वाढ नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट