शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक भाजीपाल्याचा व्हिडीओ चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

तपूर : दैनंदिन आहारातील कोमेजलेला भाजीपाला रसायनात बुडवून टवटवीत करून बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा व्हिडीओ सर्वत्र ...

तपूर : दैनंदिन आहारातील कोमेजलेला भाजीपाला रसायनात बुडवून टवटवीत करून बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असताना त्या मागची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हटले आहे. एका ऑरगॅनिक कंपनीच्या मार्केटिंग प्रतिनिधीने आपल्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर केलेले हे प्रात्यक्षिक गवताचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोमेजलेला दैनंदिन भाजीपाला एका विशिष्ट रसायनात बुडवून तो बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यापारीवर्ग सर्वसामान्यांची फसवणूक करत असून भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावा, असे चित्र त्या व्हिडीओतून वायरल केले जात आहे. यामागची सत्यता पडताळण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली असून त्यात त्यांना यशही मिळाले आहे. एका मार्केटिंग कंपनीचा हा व्हिडीओ असून त्या कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी आपल्या प्रॉडक्टचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. यात वापरण्यात आलेले द्रावण हे शेतातील उभ्या पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे डिस्ट्रिब्यूटर राजेंद्र बागुल व सचिन भारती यांनी सांगितले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वत्र व्हायरल झालेला हा व्हिडीओ नाशिकचा नसून चांदवडचा आहे. चांदवडमधील एका शेतकऱ्याच्या बांधावर हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. या व्हिडीओमागील सत्यता समोर आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश परळीकर, अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर, आर. डी. सूर्यवंशी, अविनाश दाभाडे, संदीप देवरे, प्रमोद पाटील आदींनी प्रयत्न केले आहे.

चौकट :- चुकीच्या व्हायरलमुळे एखाद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्हायरल करण्यापूर्वी त्यामागची सत्यता पडताळून पाहणे अपेक्षित आहे.

- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन.

230721\23nsk_26_23072021_13.jpg

फोटो :- अन्न व औषध प्रशासन विभागात सेव्ह ईको ऑर्गानिकचे डिस्ट्रीब्यूटर राजेंद्र बागुल व सचिन भारती यांचा जबाब नोंदवताना अन्न सुरक्षा अधिकारी.