दिंडोरी : तालुक्यातील लखमापुर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका रासायनिक कंपनीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकत अवैध स्पिरिटचा साठा जप्त केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.लखमापूर औद्योगिक वसाहतीत तुरटी बनविणारी कंपनी असून येथे दुपारी तीन च्या सुमारास तीन चार लाल, अंबर असलेल्या गाडया तसेच इतर काही खासगी वाहनांमधून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. अधिकाऱ्यांनी तपासास प्रारंभ केला असता अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली. कंपनीत शंभर हुन अधिक ड्रम मध्ये स्पिरिट सदृश्य रासायनिक द्रव्य सापडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सदर पथकाने या कारवाई बाबत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने अधिकृत माहिती मिळू शकली नाही. सदर रासायनिक द्रव्य तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब पथकाला बोलाविण्यात आल्याचे समजते. (वार्ताहर)
उत्पादन शुल्क विभागाची रासायनिक कंपनीत धाड
By admin | Updated: January 6, 2017 01:03 IST