शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

या कंपनीकडून ‘टेली कॉलर’द्वारे कॉल केले जात आहेत. लकी ड्रॉमुळे तुम्हाला १४,३०० रुपयांचा महागडा अँड्रॉईड फोन अवघ्या ४,३०० रुपयांत प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मोबाईल घेण्याची इच्छा असल्यास तुमचे नाव व संपूर्ण पत्ता सांगितल्यास पार्सलद्वारे मोबाईल पाठविला जाईल. पार्सल सोडवून घेताना तुम्हाला ४,३०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले जाते. महागडा मोबाईल स्वस्तात मिळत असल्याने बरेच जण हुरळून जाऊन पार्सल पाठविण्यास सांगतात. पार्सल सोडविल्यानंतर मात्र, त्यांना कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते.  सातपूर येथील सोनू सिंग या युवकास काही दिवासांपूर्वी फोन आला. लकी ड्रॉमध्ये तुम्ही विजयी ठरला असून, १४ हजार रुपये किमतीच्या अँड्रॉईड मोबाईलचे हक्कदार झाला आहात, असे समोरील व्यक्तीने सांगितले. या फोनमुळे सोनू आनंदीत झाला. १४ हजारांचा मोबाईल चार हजारात मिळतोय म्हणून त्याने पार्सल पाठविण्यास सांगितले. मोबाईल पसंत न पडल्यास त्याची विक्री करून थोडा फार नफा कमावता येईल,असा विचारही त्याने केला. फोन पसंत न पडल्यास तुम्ही वापसही करू शकता, असे कंपनीने सांगितले होते, त्यामुळे सोनूने तशी आॅर्डर दिली. दोन दिवसांतच सोनूला पार्सल मिळाले. पार्सल उघडल्यानंतर त्यात चक्क दोन हजार रुपयांचा चिनी बनावटीचा फोन आढळला. फसवणूक झालेल्या सोनूने कंपनीशी अनेकदा संपर्क साधला; परंतु कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. अंबड येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या राजेश चव्हाण यांना देखील अशा प्रकारचा फोन आला. त्यांनीदेखील अँड्रॉईड फोन पाठविण्यास होकार दर्शविला. कुरिअर चालकाकडे ४,३०० रुपये भरून त्यांनी मोठ्या हौसेने पार्सल सोडवून घेतले. घरी गेल्यानंतर पार्सल उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. कारण पार्सलमध्ये पावडरचे डबे आणि दारू सोडण्याचे औषध ठेवले होते. ‘अँड्रॉईड फोनच्या नावाखाली फसवणूक झाल्यानंतर मी अनेकदा कंपनीला फोन केले; परंतु कुणी दाद दिली नाही. एका व्यक्तीने तर शिवीगाळ करून धमकीही दिली, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.