शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चौधरीचा अटकपूर्व जामीन नामंजूर

By admin | Updated: October 30, 2015 23:30 IST

निलंबित पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्या : अटकेचा मार्ग मोकळा

नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित सागर चौधरीचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी शुक्रवारी (दि़ ३०) नामंजूर केल्याने त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरीने २० आॅक्टोबरला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता़ त्यावर २६ आॅक्टोबरला सरकारी वकील व चौधरीच्या वकिलांनी आपले लेखी म्हणणे व युक्तिवाद सादर केले असता, न्यायालयाने ३० आॅक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता़ शुक्रवारी पुन्हा न्यायालयात दोन्ही बाजुंनी युक्तीवाद केला. चौधरीचे वकील अ‍ॅड़ बिपीन पांडे यांनी चौधरीवरील गुन्हे हे महसूल विभागाचे असून तो वाळूमाफिया नसल्याचा अर्ज दिला़ त्यावर जिल्हा सरकारी वकील घुमरे यांनी चौधरीवर जळगाव महसूल विभागाने दाखल केलेले ५ गुन्हे व दंडाच्या पावत्या सादर करून तो वाळू व्यावसायिक व माफिया असल्याचे पुरावे सादर केले़ तसेच जळगावमध्ये बदली झाल्यानंतर वरिष्ठांना हाताशी धरून सादरेंवर गुन्हे दाखल झाल्याचे सांगून, चौधरीच्या अटकेशिवाय वरिष्ठांचा सहभाग व या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नसल्याने अटकपूर्व नामंजूर करण्याची विनंती केली़ यानंतर दुपारी न्यायाधीश कदम यांनी चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज नांमजूर केला़ या गुन्ह्णाचा तपास पोलिसांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला असून शनिवारी (दि़ ३१) त्यांच्याकडे तपासाची कागदपत्रे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे़ (पान ५ वर)दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या या निकालाची प्रत मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे चौधरीचे वकील शिंपी यांनी सांगितले आहे़जळगावमधील रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ आॅक्टोबरला आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले होते़ त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात माधुरी सादरे यांच्या फिर्यादीवरून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांच्यावर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़(प्रतिनिधी)