शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत खरेदीसाठी मोजके शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:11 IST

शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहे; मात्र नागरिकांकडून ...

शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहे; मात्र नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन होतच असल्याने पोलीस व मनपा प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन‌् प्रवेश शुल्क वसुलीची मात्रा शोधून काढली आहे. शहरात शिवाजीरोड, मेनरोड, गाडगेमहाराज पुतळा ते सरस्वती चौकापर्यंत (बादशाही कॉर्नर) खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी उसळते. दिवसभर या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून येते. यामुळे या गर्दीवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी या बाजारपेठेकडे येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी सोमवारी बॅरिकेड टाकून बंद केले. बादशाही कॉर्नर, नवापुरा गल्ली, धुमाळ पॉइंट, सेंट थॉमस चर्च कॉर्नर, वावरे गल्ली, या ठिकाणांहून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रत्येक पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून, राज्य पोलीस कायदा कलम-४३ अनुसार गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशाप्रकारचा प्रयोग शहरात राबविला जात असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे प्रयोग बाजारपेठांमध्ये राबविण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच वेळ असल्याची चर्चा होत आहे.

--इन्फो--

या ठिकाणीही असणार हाच नियम

सिटी सेंटर मॉल (प्रवेश शुल्क-५ रु. वेळ: एक तास)

पंचवटी येथील बाजार समिती

पवननगर भाजी मार्केट, सिडको

अशोकनगर भाजी मार्केट, सातपूर

कलानगर भाजी मार्केट, इंदिरानगर

---इन्फो---

विक्रेते, कर्मचाऱ्यांना पास

बाजारपेठांमधील विक्रेते व त्यांच्याकडील कामगारांना प्रवेशासाठी भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या वतीने विहित नमुन्यातील पास दिले जाणार आहेत. हे पास दाखवून त्यांना बाजारपेठेत आपापल्या व्यवसायासाठी जाता येणार आहे. तसेच या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पत्त्याचा पुरावा दाखवून (आधार कार्ड) विनाशुल्क प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.