शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयमा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:01 IST

उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी सांगिंतले, तर आयमा ही कोणा एकट्याची संघटना नसल्याने अध्यक्षपदाचा शब्द देण्याचा विषय नसल्याचे सत्ताधारी एकाता पॅनलचे उमेदवारवरून तलवार यांनी सांगितले.

सिडको : उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी सांगिंतले, तर आयमा ही कोणा एकट्याची संघटना नसल्याने अध्यक्षपदाचा शब्द देण्याचा विषय नसल्याचे सत्ताधारी एकाता पॅनलचे उमेदवारवरून तलवार यांनी सांगितले.  आयमाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून, येत्या २९ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असताना सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाचे सत्ताधारी पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.  एकता पॅनलच्या विरोधी गटाचे प्रतिनिधित्व करणाºया संजय महाजन यांनी २०१४-२0१६ मध्ये झोलल्या निवडणुकीत पुढील निवडणुकीत तुषार चव्हाण यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला होता. मात्र आता विश्वासात न घेता समोरील गटाने वरूण तलवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले असे सांगतानाच आयमा हाउस हे त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी दीर्घ मुदतीवर व अल्पमोबदल्यात कराराने दिले होते, परंतु यास आक्षेप घेतल्याने आज आयमा हाउस आयमाच्या ताब्यात आहे, असा आरोपही महाजन यांनी केला. त्याचे खंडन करताना सत्ताधारी एकता पॅनलचे मुख्य प्रवर्तक धनंजय बेळे यांनी आयमा ही कोणा एकट्याची नसून उद्योजकांची संघटना आहे. त्यामुळे तुषार चव्हाण यांनी आपल्याला पुढील अध्यक्ष बनविण्यासाठी लेखी देण्याचा प्रश्नच नाही. तसेच संघटेनेत राहून संघटेनच्या विरोधात चॅरिटी कमिशनरकडे तक्रारी करावयाच्या ही बाब संघटेच्या दुष्टीने चुकीची असून, आजही तुषार चव्हाण व संजय महाजन यांनी संघटेच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.उद्योजकांचे नेतृत्व करणाºया अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनल या दोघांकडून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याच चित्र बघावयास मिळात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक