शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसार्इंवर नाशकात चप्पलफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 23:28 IST

कपालेश्वर मंदिरातील घटना : गर्भगृहात प्रवेशापासून पुन्हा रोखले

नाशिक : गेल्या आठवड्यात संतप्त भाविकांनी केलेल्या विरोधामुळे श्री कपालेश्वर मंदिरात दर्शनाची संधी न मिळाल्याने गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पुन्हा श्री कपालेश्वर महादेव मंदिरात आल्या खऱ्या; मात्र जमलेल्या शेकडो भाविकांनी देसाई यांना कडाडून विरोध करून गर्भगृहात प्रवेशापासून रोखल्याने देसाई यांना ‘दूर’ दर्शनच करावे लागले. मंदिराच्या सभागृहातून दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताच संतप्त जमावापैकी कोणी देसाई यांना धक्काबुक्की केली, तर कोणी त्यांच्यावर विटा व चपलांचा मारा केला; मात्र त्याच परिस्थितीत पोलिसांनी देसाई यांना सुरक्षा कवच करत सुखरूपपणे मंदिराबाहेर काढले व पोलीस वाहनात बसवून नेले. गेल्या आठवड्यात गुरुवारी देसाई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. तब्बल तीन तास त्या कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यालयात तळ ठोकून होत्या. त्यावेळीदेखील मंदिराच्या गुरव तसेच शेकडो भाविकांनी त्यांच्या गर्भगृह प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. मागीलवेळी जाहीर केल्यानुसार देसाई या गुरूवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाल्या. देसाई मंदिरात येणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सकाळपासूनच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वाबारा वाजता देसाई मंदिरात आल्या खऱ्या; मात्र त्यांना विरोध दर्शविण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात पुजारी तसेच शेकडो भाविकांनी ठिय्या दिला होता. देसाई मंदिराच्या आवारात येताच पोलिसांनी त्यांना थेट मंदिरात आणले. तेथे देवासमोर हात जोडल्यानंतर त्यांनी गर्भगृहात जाण्याची तयारी केली; मात्र प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या महिलांनी तसेच मंदिरात जमलेल्या भाविकांनी एकच आरडाओरड करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि काही क्षणातच पोलिसांनी देसाई यांना मंदिराबाहेर काढले. दक्षिण दरवाजाने देसाई मंदिराबाहेर पडत असतानाच जमावापैकी काही भाविकांनी त्यांना धक्काबुक्की केली, तर एका भाविकाने देसाई यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस देसाई यांना घेऊन जात असताना मंदिर परिसरात गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर देसाई यांना पोलिसांनी सुरक्षित पुण्याकडे रवाना केले. परंतु देसाई यांना दुपारी सिन्नर येथे सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा नाशिकला येण्याचा प्रयत्न केला. सदर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी देसाई यांना नाशिकरोडजवळील सिन्नरफाटा येथे अडवून धरले. सायंकाळपर्यंत देसाई सिन्नरफाटा येथे तळ ठोकून होत्या.