शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भीड चेपली !

By किरण अग्रवाल | Updated: January 6, 2019 01:45 IST

कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्देपोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत आहेसामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्याचे स्पष्ट व्हावे.मनमाड येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीचा पाठलाग करून त्यास जेरबंद करू पाहणाºया एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या सहकारी पोलिसावर संबंधिताने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे, तर नाशकात अतिक्रमण हटाव पथकात सेवा बजावत असताना वडाळा नाका परिसरात तीन पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली गेली आहे. या अगदी काल-परवातील दोन घटनांचा उल्लेख येथे केला असला तरी, यापूर्वीच्या अशा घटनांची बेरीज थोडी थोडकी नाही. नाशकात गेल्या सहा महिन्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन डझन एवढ्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात व विशेषत: मालेगावच्या गिरणा काठी अवैध वाळू उपसा करणारे लोक महसुली कर्मचाºयांच्या अंगावर सरळ सरळ गाड्या घालत असल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात, तसे नाशकात वाहतूक नियंत्रित करणाºया पोलिसाला कानशिलात लगावून अनेकदा बेशिस्त रिक्षाचालक बेगुमानपणे पसार होत असतात. कायदा हातात घेण्याबद्दलची भीतीच उरली नसल्याने हे प्रकार वाढत आहेत. एरव्ही सामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा अशी स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न यातून उपस्थित व्हावा. यंत्रणेचा धाक ओसरल्याचे तर यातून दिसून येतेच; पण महत्त्वाचे म्हणजे तीत काम करणाºया नोकरदारांच्या मनोधैर्यावरही त्याचा परिणाम झाल्याखेरीज राहात नाही. तेव्हा सार्वजनिक स्वरूपात दहशत निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे नाशिकरोडच्या नेहरूनगरमधील वाहने पेटवून देण्याचे प्रकार असोत, की सरकारी यंत्रणेत कर्तव्य बजावणाºयांवर हात उगारण्याचे; त्याबद्दल संबंधिताना हिसका दाखवणेच आवश्यक आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच तातडीचे ठरावे.