शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बदलते तंत्रज्ञान बँक लुटारूंच्या पथ्यावर

By admin | Updated: August 11, 2014 00:55 IST

बदलते तंत्रज्ञान बँक लुटारूंच्या पथ्यावर

बदलते तंत्रज्ञान बँक लुटारूंच्या पथ्यावरआॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारींतही वाढनाशिक : बॅँकींगमध्ये बदलते तंत्रज्ञान ग्राहकांना फायदेशिर असले तरी त्यामुळे लुटारूंनाही आयते कोलीत मिळाले आहे. आता लुटारूंना प्रत्यक्ष दरोडेखोर होवून कष्टाने बॅँक पोडण्याची गरज राहिलेली नाही. सूशिक्षीत आणि संगणक शास्त्रात तरबेज असलेले व्हाईट कॉलर गुन्हेगारही या लुटारूंमध्ये सामील झालेले आहेत. संगणकाचे आधुनिक ज्ञान आणि त्यातील छुपे मार्ग माहित असतील तर सहजासहजी दुसऱ्याच्या अकाउंटवर धरोडा घालता येते. त्यामुळे जसजशा सूविधा वाढत जातील तसेच त्यातील धोके वाढत जाणारच. सायबर तंत्रज्ञानात होणा-या नवनवीन बदलांचा वापर करून सायबर गुन्हेगार नवनव्या क्लृप्त्या वापरत आहेत. काही टोळ्या खातेधारकाला ‘बँक अलर्ट’ जाऊ नये, यासाठी पैसे काढण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे मोबाइल कार्ड ब्लॉक करतात. यासाठी बोगस कागदपत्रांच्या साहाय्याने त्याच व्यक्तीच्या नावाने दुसरे सीमकार्ड घेण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढल्यानंतर त्याला बँकेकडून अलर्ट येत नाही. या कामासाठी या टोळयÞा देशातील व्यक्तींचा वापर करतात. नाशिकमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. या प्रकारांमुळे कार्डधारकांचेच नुकसान नव्हे; तर बँकांवरील विश्वासालाही तडा जात आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी, क्र ेडिट अथवा डेबिड कार्डला पिन क्र मांक देण्यात यावा. हे कार्ड पोस्टाने न पाठवता, प्रत्यक्ष ग्राहकाच्या हातात द्यावे, तसेच कार्ड बनवण्याचे काम बाहेरच्या कंपनीला देण्याऐवजी बँकांनी ते स्वत:च बनवावे,’ अशा सूचना केल्या आहेत. चीपचा वापर करण्याची सुचनाया प्रकरणी सध्या क्र ेडिट कार्डमध्ये मॅगनेटीक पट्टीचा वापर केला जातो. त्याच्याऐवजी चीपचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. मॅगनेटीक पट्टीतील माहिती सहज कॉपी करता येऊ शकते. पण चीपमधील माहिती ‘इनस्क्रीप्टेड फॉरमॅट’मध्ये असल्याने त्याची क्लोनिंग करणे शक्य होत नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळेही सायबर क्लोनिगला लगाम लावणे शक्य होऊ शकते. त्यासाठी डेबिट अथवा क्र ेडिट कार्डचा वापर करताना प्रत्यक्षात स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोकर अथवा इतर व्यक्तींमार्फत एटीएममधून रक्कम काढल्यास कार्डचा गरवापर होऊ शकतो. याशिवाय आॅनलाइन रक्कम भरताना कार्ड क्र मांकाची माहिती देणे टाळावे, त्यामुळेही सायबर क्र ाइम थांबवता येणे शक्य आहे.* एटीएम सेंटरवर गेल्यानंतर मशिनमध्ये स्किमर अथवा आजूबाजूला कॅमेरा बसवलेला नाही ना, हे तपासून पाहा.* एटीएम सेंटरवरील मशिनमध्ये पासवर्ड टाकताना वर हात धरा.* येणारे ई-मेल, फोन, एसएमएसला उत्तर देताना सावधानता बाळगा. त्याद्वारे खासगी माहिती व इतर माहितीची विचारपूर्वक उत्तरे द्या.* तुमचा सोशल सिक्युरिटी क्र मांक देऊन नका.* बँक खाते नियमति तपासून पाहा.* बँक खाती, ई-मेल अकाऊंट, सोशल नेटविर्कंग साइटचे पासवर्ड नियमति बदला.* ई-मेल आयडी निर्माण करतानाचा प्रश्न व त्याचे उत्तर कोणाला सांगू नका.आता टॅब्लेट बँकिंगहीइंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाच आता बँकिंग जगताने नव्याने होऊ घातलेली टॅब्लेट क्र ांती कॅश करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी ‘टॅब बँकिंग’ ही नवी सेवा सुरू करून खासगी क्षेत्रात अग्रणी असलेल्या बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता खाते उघडण्यासाठी बँकांच्या शाखेत हेलपाटे न मारता घरच्या घरी किंवा कार्यालयातच ते उघडता येऊ शकेल. केवळ इतकेच नाही, तर आणखी चार नवीन सेवा बँकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.ग्राहकांना अखंडित व आनंदपूर्ण अनुभव देण्यासाठी ५ एमपी कॅमेरा व जलद प्रोसेसर असलेला हाय-एंड कस्टमाइज्ड टॅब्लेट ही या उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत.बँक अधिकारी या टॅब्लेटमार्फत अर्ज भरण्यासाठी ग्राहकांना मदत करतात. यामध्ये बिल्ट-इन तपासणीची सोय आहे, ज्यामुळे अर्जातील सर्व तपशील बरोबर असल्याची आणि आवश्यक ती सर्व माहिती बरोबर घेतल्याची खात्री मिळते. ग्राहकाचा फोटो घेण्यासाठी आणि त्याची केवायसी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी उपयोग. त्यामुळे प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करण्याची गरज नाही. माहिती पूर्ण भरून झाली की, ती तातडीने बॅक-एंड यंत्रणेत अपलोड केली जाते आणि यामुळे बँक खाते उघडण्याची प्रक्रि या झटपट होण्यास मदत होते. २४ बाय ७ इलेक्ट्रॉनिक शाखाबँकेने २४ बाय ७ इलेक्ट्रॉनिक शाखा दाखल केल्या आहेत, ज्या सर्व बँकिंग व्यवहारांसाठी वन-स्टॉप शॉप आहेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार, विविध आॅटोमेटेड उपकरणांच्या मदतीने स्वत:चे स्वत: व्यवहार करता येतील. इलेक्ट्रॉनिक शाखा चेक डिपॉझटि मशीन, डेबिट कार्ड स्वाइप करून इंटरनेट बँकिंग सेवा वापरता येईल असे संवादात्मक किआॅस्क, तातडीने पैसे जमा करणारे कॅश डिपॉझटि मशीन अनेक बॅँकांनी उपलब्ध केले आहे. याशिवाय थेट आॅनलाईन मनी ट्रान्सपर योजनाही असल्याने भविष्यात र्बंकेत जाण्याची गरजच राहणार नाही असे चित्र दिसते आहे. बँकिंग व्यवहार सुविधा* ग्राहकांना अखंडित सेवा पुरवण्याकरता पीएमसी बँक सकाळी८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालू असते.* नोकरदार मंडळींच्या सोयीकरता काही बॅँका रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशीदेखील चालू असते . * कोअर बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकांना कुठल्याही शाखेतून व्यवहार करता येतात. ग्राहकांच्या सोयीकरता बँका कुठलेही अतिरिक्त शुल्क न आकारता टोकनलेस बँकिंगची सुविधा पुरवते.* देशभरात कुठेही ताबडतोब पैसे पाठवण्याकरता बँका नाममात्र शुल्काने सुविधा पुरवतात.* कर ई-पेमेंट पद्धतीने भरण्याची सेवा, त्यात अग्रीम कर, स्वयंमूल्यांकन कर, नियमित मूल्यांकनावरील कर, टीडीएस, संपत्तीकर/सिक्युरीटी व्यवहार कर, हॉटेल पावती कर/व्याजावरील कर/जमिनजुमल्यावरील कर, बक्षिस कर, किरकोळ लाभ कर, सेवा कर, मूल्यविर्धत कर, सेवा कर, अबकारी कर आदिंसाठी सेवा पुरविते.* ग्राहकांना आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड पुरवतात. या कार्डाच्या साह्याने व्हिसाचे विस्तृत जागतिक जाळे व अन्य लाभ तसेच विशेष हक्क, मिळू शकतात. व्हिसाची सोय असलेल्या एटीएममध्येदेखील हे कार्ड वापरता येते.* मोबाईल इंटरनेट बँकिंग - इंटरनेट बँकिंगमुळे ग्राहकांना त्यांचे खाते बघणे, विवरणपत्र डाऊनलोड करणे व धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवणे या गोष्टी घरबसल्या करता येतात.* जीवन विमा/अन्य विमा उत्पादने व म्युच्युअल फंड्स - आयआरडीए च्या नियमांनुसार जीवन विमा/अन्य विमा उत्पादनांच्या क्षेत्रात ‘कॉर्पोरेट एजंट’म्हणून काम करणाऱ्या अनेक बॅँका आहेत.