शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशिकचा बदलणार चेहरामोहरा

By admin | Updated: September 21, 2016 00:35 IST

स्मार्ट सिटी : हनुमानवाडीचे पालटणार रूपडे, पाणीपुरवठ्यात तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीत अखेर नाशिकचा समावेश झाला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील बदलानंतर नाशिकचा आणखी नव्या विकास पर्वाला प्रारंभ होणार आहे. नाशिक महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असून, ग्रीनफिल्ड अंतर्गत पंचवटीतील हनुमानवाडीचेही रूपडे पालटणार आहे. याशिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणीपुरवठा व पार्किंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीसाठी महापालिकेने ३० जून २०१६ रोजी केंद्राला आराखडा सादर केला होता. दुसऱ्या फेरीत नाशिकची निवड अपेक्षित मानली जात होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक दौऱ्यात नाशिकची स्मार्ट निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नाशिकचा समावेश झाला असून, नाशिकने महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये कल्याण, डोंबिवली, नागपूर, ठाणे शहरांनंतर चौथा क्रमांक मिळविला आहे, तर एकूण २७ शहरांच्या यादीत ११व्या स्थानावर झेप घेतली आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी लोकांचाही सहभाग घेण्यात आला होता. प्रस्ताव तयार करण्यासाठी ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. प्रस्तावात नाशिक महापालिकेने पॅनसिटी, रेट्रोफिटिंग आणि ग्रीनफिल्ड याअंतर्गत तीन प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार जुन्या नाशिकची पुनर्विकास योजना आहे.