शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काम चुकारांच्या करणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:15 IST

दोडी ग्रामीण रुग्णालयातील कामचुकार कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.

सिन्नर : दोडी ग्रामीण रुग्णालयातील कामचुकार कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रुग्ण व नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. सर्वाधिक तक्रारी कर्मचाºयांविरोधात करण्यात आल्याने डॉक्टरांखेरीज कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दोडी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यासाठी उशीर केला जातो, दूरध्वनी उचलले जात नाहीत, सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होतात, काही कर्मचारी रात्री दारू पिऊन येतात, पंखे बंद आहेत, लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी यावेळी उपस्थितांनी मांडल्या. शालेय तपासणीसाठी एनआरएचएमचे सहा डॉक्टर व कर्मचाºयांचे पथक आहे. यातील काहीजण मुख्यालयाकडे फिरकत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोडी ग्रामीण रुग्णालयातील समस्यांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र दोन महिन्यानंतरही त्याची माहिती देण्यात आली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी सांगितले. दैनंदिन नोंदीचे मस्टर बुक भरले जात नसल्याबाबत सांगळे यांनी कर्मचाºयांना चांगलेच फैलावर धरले. कामात टाळाटाळ करणाºया कर्मचाºयांचे पगार बंद करण्याची मागणी करण्यात आली. आढावा बैठकीनंतरही कर्मचाºयांच्या कामात सुधारणा न झाल्यास दोडी ग्रामीण रुग्णालयास टाळे लावण्याचा इशारा ब्रह्मानंद फाउण्डेशनचे गणपत केदार यांनी दिला. यावेळी उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड, सरपंच लीला सांगळे, महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र दुसाने, एकनात आव्हाड, दोडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयसंह मुंडे यांच्यासह रुग्ण, नातेवाईक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.