मनोज वैद्य, दहिवड (ता. देवळा)भाषा विषयाचा धडा व कवितेवर प्रश्नोत्तरे देऊन विद्यार्थ्यांनी लिहिण्याच्या पारंपरिक सवयीस फाटा देऊन विद्यार्थ्याच्या विचारक्षमता व थेट कृतीला वाव देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने भाषा विषयाच्या परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका असे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे.दहावीच्या मराठी, हिंदी, संस्कृत, कन्नड यासह दहा प्रथम भाषा विषयाची परीक्षा पुढील वर्षापासून कृतिपत्रके आधारे घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा पाठांतराकडे असलेला कल कमी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. हा प्रयोग यंदा नववीसाठी सुरू करण्यात आला असून, पुढील वर्षी दहावीसाठी लागू करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्न सोडवताना विद्यार्थी अंदाज बांधून उत्तरे लिहितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये खरोखर भाषाज्ञान कौशल्य आत्मसात केले की नाही? ते कळत नाही. त्यामुळे प्रश्नाऐवजी कृतीयुक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. चालू पद्धतीत निबंधाला १० गुण होते. विद्यार्थी पाठांतर करून उत्तरे लिहीत असतात. मात्र आता एखादे वाक्य दिले जाईल. वाक्यावर विचार करून कल्पना-शक्तीचा वापर करून विद्यार्थ्याने वर्णन करण्याचे आहे. ज्ञान मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य व ज्ञान वाढविण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीसाठी तर पुढील वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत राज्यभर अशाच प्रकार कृत्रिपत्रिका आधारित परीक्षा पद्धत सुरू होणार आहे.
भाषा विद्यार्थिसंख्या मराठी - १२,६९,४९७हिंदी - १२,५0,६0८ संस्कृत - १,१५,२४0उर्दू - ८४,३७२गुजराथी - ८४,३७२कन्नड - २,९८६तेलुगु - ७७९सिंधी - ४0३