शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:14 IST

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते.

ठळक मुद्देचांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकतेछोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते रावसाहेब थोरात सभागृह येथे आनंद अ‍ॅग्रो ग्रुप व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. गुरुवारी (दि.५) सायंकाळी हा सोहळा दिमाखात पार पडला. ते पुढे म्हणाले की, चांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकते. आपले अनुभवविश्व संपन्न होऊ शकते. छोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई आपण लढू शकतो. याप्रसंगी गौरी सावंत (समाजसेवा), अरविंद जगताप (लेखक, दिग्दर्शक), सारिका अहिरराव (पोलीस), अश्विनी बोरस्ते (समाजसेवा), सोमनाथ कोकरे (छायाचित्रकार), डॉ. तानाजी वाघ, विश्वास ठाकूर (सहकार), समाधान हिरे (उद्योजक), कृष्णा भामरे (कृषिमित्र), डॉ. सरोज जगताप (शैक्षणिक), चंद्रशेखर सोनवणे (लायन्स क्लब) यांना मान्यवरांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी मार्गदर्शन केले. मानिनी दाणी यांनी स्वागतगीत म्हटले. सुरेश पवार यांनी स्वागत केले. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव अहेर यांनी पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्पष्ट करतानाच आजवरचे अनुभवही नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श पोल्ट्री उद्योजक’, ‘आभाळाचा उंबरा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार प्रतापराव सोनवणे, शशिकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.चांगले बदल घडविण्यासाठी प्रेरणा घ्यावीप्रतिकूल परिस्थितीतही समाजात चांगले बदल घडवून आणणाऱ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बदलाकडे वाटचाल करणारी लघुरूपातील ताकद या पुरस्कारार्थींच्या रूपाने दिसत असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.