शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पालिकेने जागेचा ठराव बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:30 IST

येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला पालिकेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांना भाजपाच्या शहर पदाधिकारी यांनी दिले. दरम्यान, शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक रुपेश लोणारी यांनीदेखील स्मारक योग्य जागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : सेनापती तात्या टोपे स्मारक सुयोग्य जागी व्हावेसाडेतीन कोटी रुपयांचा निधीदेखील पालिकेकडे वर्ग झाल्याची माहिती

येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला पालिकेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांना भाजपाच्या शहर पदाधिकारी यांनी दिले. दरम्यान, शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक रुपेश लोणारी यांनीदेखील स्मारक योग्य जागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.भाजपा शहर अध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा नेते धनंजय कुलकर्णी,गणेश खळेकर, मयूर मेघराज, दिनेश परदेशी, गणेश गायकवाड, सुनील सस्कर, संजय आचारी, दीपक खेरूड, दत्तात्रय नागडेकर, बडाअण्णा शिंदे यांनी हे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, तात्या टोपे यांचे सुमारे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे अद्वितीय स्मारक निर्माण करण्याचे केंद्र शासनाने नियोजित केले आहे. यापैकी साडेतीन कोटी रुपयांचा निधीदेखील पालिकेकडे वर्ग झाल्याची माहिती आहे.पालिकेने या स्मारकाच्या निर्मितीसाठीची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. हे स्मारक कोर्ट मैदानाजवळील पर्यटकांना येण्या-जाण्यासाठी रस्तादेखील नसलेल्या साठवण तलावाकडील नांदूररोड लगत गैरसोयीची असलेल्या अडचणीच्या जागी होत आहे.या जागेबाबत येवला शहरातील नागरिकांचा विरोध आहे. येवला पालिकेने केवळ पैसे परत जाऊ नये यासाठी घाईघाईने अडगळीच्या जागी केलेला ठराव बदलावा, अशी मागणी केली आहे.