शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यासंदर्भातील निकष बदलावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:39 IST

शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने अंगणवाड्या चालविण्यासाठी प्रचलित निकषात बदल करून वीस ते चोवीस मुले असतील तरीही अंगणवाड्या चालूच ठेवाव्यात, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे.

नाशिक : शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने अंगणवाड्या चालविण्यासाठी प्रचलित निकषात बदल करून वीस ते चोवीस मुले असतील तरीही अंगणवाड्या चालूच ठेवाव्यात, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे.  महापालिकेच्या प्रस्तावामुळे अडचणीत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी नुकतीच आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली होती. त्याअनुषंगाने फरांदे यांनी महापौरांना पत्र पाठवून याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. महापालिका अधिनियमानुसार दि. १० डिसेंबर ९३ रोजी ठराव क्र .१७३ करण्यात आला. त्यानुसार शहरांतील अंगणवाड्यांमधील पटसंख्या ३५ ते ४० असणे आवश्यक आहे. मात्र अनेक अंगणवाड्यांमध्ये ही पटसंख्या २० ते २४ च्या असल्याच्याच घरात असल्याने महापालिकेने या अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे टाळण्यासाठी महासभेत ठरवण्यात आलेली पटसंख्या ही कमी करून किमान पटसंख्या २० ते २४ करण्याचा ठराव महासभेत मांडण्यात येऊन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका