शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

भारिनयमन वेळेत बदल करण्याचीमागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:02 IST

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले

ठळक मुद्देभारनियमनाच्या निश्चित करण्यात आलेला कालावधी तेवढाच ठेऊन केवळ संध्याकाळी रात्री २ तास उशिरा वीज पुरवठा सुरु करावा आणि सकाळी २ तास उशिरा बंद करावी एवढी माफक अपेक्षा शेतकº्यांनी व्यक्त केली आहे म्हणजे रात्री १२ वाजता सुरु करु न सकाळी ८ वाजता बंद करण्यात यावा

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारलेवीज वितरण कंपनी ग्रामीण भागातील दर महिन्याला भारिनयम वेळेत बदल करत आहे.दि.१ नोव्हेंबर पासून पुन्हा बदल झाल्याने औरंगपूर सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाº्या भेंडाळी,औरंगपूर, बागलवाडी,महाजनपुर या गावांना रात्री १०वाजून१० मिनिटांनी वीज पुरवठा सुरु केला जातो. पहाटे ६वाजता वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीच वीज येते आणि रात्रीच जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे शेतात पीक उभे आहे त्यांना पाणी देण्याची गरज आहे ,परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती निर्माण झाली आहे, महाजनपुर येथे काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी पाच बिबटे पकडले आहे .अशा परिस्थितीत रात्री जागून पिकांना पाणी देता येत नाही घरातील वापराचे पाणी सकाळी भरण्याअगोदर वीजगायब होते दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.चार दिवसांपासून शेतकºयांचा संताप असल्याने सकाळी शेतकरी जमा झाले. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालय बाहेरून बंद करून कर्मचाºयांना कोंडून घेतले. यावेळीकनिष्ठ अभियंता साताळे दाखल झाले .शेतकरी भाऊसाहेब कमानकर, दीपक कमानकर, शरद खालकर,गोरख खालकर, मच्छिंद्र खालकर, श्याम खालकर यांनी आपले मागण्या मांडल्या,यावेळी वेळेचे नियोजन केले जाते, स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नसल्याने आम्ही कोणताही बदल करू शकत नाही. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल केवळ असे आश्वासन सताळे यांनी दिल्याने शेतकº्यांचे समाधान झाले नाही. यावेळी दोन दिवसात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला यावेळी शेतकरी उपस्थित होते