चांदवड : तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पेण्टाव्हॅर्लट लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती अनिता जाधव, माजी आरोग्य व शिक्षण सभापती ज्योती माळी, पंचायत समिती सदस्य यू. के. अहेर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय तसेच गावपातळीवरील लसीकरण केंद्रात ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली. पाच आजारांच्या लसी एकत्रित करून पेण्टाव्हॅर्लट ही लस तयार करण्यात आली आहे. बालकास पुन्हा पुन्हा इंजेक्शन टोचण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. पेण्टाव्हॅर्लट लसीची किंमत एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे ही महागडी लस गरिबांना घेणे परवडत नसल्याने ही लस सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांना आपल्या बालकांना ही लस घेण्याविषयी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर )
चांदवडला लसीकरण
By admin | Updated: November 24, 2015 21:58 IST