शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड : कृउबा समितीत फुलांचे नियमित लिलाव सुरू

By admin | Updated: October 1, 2016 23:27 IST

परिसरातील शेतकऱ्यांची झाली सोय

चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर शुक्रवारपासून (दि. ३०) फुले शेतमालाचे नियमित लिलाव सुरू करण्यात आले. दि. २ सप्टेंबरपासून फुलांच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला होता. शुुभारंभानंतर मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होऊन चांगले भाव मिळत होते. परंतु मधल्या काळात पितृपक्ष असल्याने फुलांची मागणी कमी होऊन आवकेवर परिणाम झाला होता. त्यामुळे फुले खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. परंतु पुढील काही दिवसांमध्ये नवरात्रोत्सवामुळे झेंडू फुलांंना मोठ्या प्रमाणात मागणी राहील तसेच शेतकऱ्यांच्या फुलांना चांगले बाजारभाव मिळतील. समिती कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड झालेली आहे.चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या अध्यक्षतेखाली फुले खरेदीदार व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी संचालक विलास ढोमसे, पंढरीनाथ खताळ व फुले खरेदीदार व्यापारी उपस्थित होते. दररोज दुपारी लिलाव होणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपली फुले ट्रॅक्टर, पिकअप वाहनात मोकळ्या स्वरूपात आणावी, असे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर व संचालक मंडळाने केले आहे. (वार्ताहर)