चांदवड : शहर व परिसरात रविवारी दुपारी ४वाजेच्या सुमारास सुमारे दीड ते दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले. चांदवड व परिसरात आतापावेतो जुन महिन्यात अखेरीस दोन मोठ्या पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापपावेतो या पावसाने पाणीटंचाई कमी होणार नव्हती .त्यामुळे मोठ्या पावसाची वाट बळीराजा पाहत होता. ढगाळ वातावरणामुळे हवेत काहीसा गारवा जरी असला तरी रोगट हवामान पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. चांदवड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. अशाच प्रकारचे दोन ते तीन पाऊस होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या पाऊसाने पीकांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट तुर्तास तरी टळले आहे.
चांदवडला दुपारी दोन तास मुसळधार पाऊस
By admin | Updated: July 24, 2016 23:09 IST