------------------------------------------------------
चांदवडला एका दिवसात नऊ नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २८ मे रोजी घेतलेल्या ३० पैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात रुग्ण आहे. तालुक्यातील चांदवड, भोयेगाव, काजीसांगवी, काळखोडे, निमोण, शिरसाणे, दुगाव, निमोण एकूण नऊ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
------------------------------------------------------
चांदवडला गटारींच्या स्वच्छतेची मागणी
चांदवड : शहरात नगरपरिषदेने आता जवळच पावसाळा येत असल्याने गटारीची स्वच्छता करावी व गटारी जवळपासच्या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. श्रीरामरोड परिसरातील गटारीच्या बाजूला झाडे तोडल्याने मोठा पालापाचोळा पडला असून, तो उचलला नाही तर गटारीत जाऊन गटारी तुंबतील. त्यामुळे परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.