शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एक कोटी ३५ लाखांचा गांजा चांदवडनजीक जप्त

By admin | Updated: December 7, 2015 22:56 IST

पोलिसांची कारवाई : दोघांना घेतले ताब्यात

चांदवड : चांदवडनजीक मंगरूळ येथील सोमा टोल नाक्यावर रविवारी रात्री ८. ३0च्या सुमारास एका आयशर टेम्पोमधून सुमारे एक कोटी ३५ लाख रुपयांचा १३00 किलो गांजा टेम्पोसह ताब्यात घेण्यात आला असून, गाडीचालक चक्रधरराव एम. मोहनराव व शेख शाहवली शेख अहमद या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री ८.३0 वाजेच्या सुमारास मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांना आयशर टेम्पोतून (क्र. एमएच १५ डीके ९५५४) गैरकायदेशीररीत्या गांजा हैदराबादकडून येवला, मनमाडमार्गे नाशिककडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खाडे यांनी चांदवडला नव्याने रुजू झालेले  पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर वराडे यांना सदर घटनेची माहिती दिली. हा टेम्पो चांदवडजवळील सोमा कंपनीच्या टोल नाक्यावर पकडण्याचे ठरले. यावेळी प्रथम वर्ग अधिकारी चांदवडचे नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांनाही पाचारण करण्यात आले. पावणेदहा वाजेच्या सुमारास मंगरूळ शिवारातील टेम्पो टोल नाक्यावर आला तेव्हा या टेम्पोचा कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने गांजा लपवलेला होता. टेम्पोच्या पुढील  बाजूस भाजीपाल्याची निशाणी म्हणून लिंबू पिशवीत बांधलेले होते. जेणेकरून हा टेम्पो लिंबू वाहतूक करीत असावा असे भासविले होते. तर या टेम्पोच्या पाठीमागे रिकामे कॅरेट भरलेले होते. तर  आजुबाजुला मासे टाकले व ओडोनीलचे खोके टाकले होते.  जेणेकरून या टेम्पोतील गांजाच्या वास कुणालाही येऊ नये, अशी परिस्थिती भासविली होती.  (पान ५ वर)सदर टेम्पो टोल नाक्यावरून  बाहेर जाताच खाडे व पोलीस कर्मचार्‍यांनी सापळा रचून चालक चक्रधरराव  एम. मोहनराव व शेख शाहवली शेख अहमद  या दोघांना  ताब्यात घेतले. त्यांना टेम्पोतून बाहेर बोलावले. ट्रेम्पोची झडती घेतली असता  टेम्पोच्या मागे बरेच मोठे रिकामे कॅरेट लावलेले होते, तर टेम्पोमध्ये गांजा कोठेही आढळून येत नव्हता मात्र जशी टेम्पोची झडती घेत होते तेव्हा पोलीस कर्मचार्‍यांना  गांजाचा वास येत होता. टेम्पोच्या वरील ताडपत्री काढली असता टेम्पोमध्ये दोन कप्पे होते. त्यात ओलसर गांजाचे ५५२ पॅकेट निळे, पांढर्‍या रंगाच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये आतून खाकी कागद लावत दोरीने बांधलेले आत ओलसर हिरव्या रंगाचा चुरगळेला पानांचा व बियांचा गांजाचे सर्व पॅकेट फोडून त्यांचे वजन केले असता ते १३00 किलो ग्रॅम भरले होते. जागेवर या अधिकार्‍यांनी प्रमाणित वजनकाटा आणून वजन केले.                याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास  अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, मनमाड विभागाचे उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहाय्यक पोलीस  निरीक्षक मधुकर वराडे, पंडित वाघ, श्रीकांत अहेर, चंद्रकांत निकम, गुळे, मोरे, जगन मोरे, निकम, रायभोळे, संजय मोरे, शांताराम बोडके  करीत आहेत.--जागेवरच पंचनामाशासकीय अधिकार्‍यांसमोर पंचनामा करण्यात आला. आजच्या बाजारभावाने दहा हजार रुपये किलो गांजाचा भाव असून, १३00 किलो गांजा हा सुमारे एक कोटी ३0 लाख रुपये किमतीचा आहे, तर या गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो सुमारे पाच लाख रुपये किमतीचा असा एकूण एक कोटी ३५ लाख १९ हजार ५७0 रुपयांचा माल ताब्यात घेतला व दोन जणांना ताब्यात घेतले आहे.