शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

.चंद्रशेखर बावनकुळे : खामखेडा येथील विद्युत वीज उपकेंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: January 30, 2015 01:00 IST

वीज सेवा लोकाभिमुख करणार

 खामखेडा : विजेची आजची स्थिती गंभीर असून, अनेक शेतकऱ्यांना पाणी आहे तर वीज नाही. काही ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होतो. भारनियमन, वीजगळती व अधिकाऱ्यांची कार्य करण्याची पद्धत बदलून वीज सेवा लोकाभिमुख करणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. खामखेडा येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, लोकांच्या समाधानासाठी काम करावयाचे असून, कागदावर योजना करून ठेकेदारांच्या भल्यासाठी योजना न राबवता लोकाभिमुख काम करण्याची गरज आहे. फीडरनिहाय शेतकरी व अधिकाऱ्यांची कृती समिती गठित करून या समितीत त्या गावांमधील सर्व सरपंच, अभियंता, लाईनमन यांना घेऊन कामाचे स्वरूप ठरवून कामात ताळमेळ आणावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरणचे अधिकारी ट्रान्सफॉर्मर जळाल्यास पंधरा-पंधरा दिवस बदलून मिळत नाही. पैशांशिवाय कामे होत नाहीत. अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी केल्या. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांना व्यासपीठासमोर उभे करत जाब विचारला.कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कार्यकारी अभियंता एल. डी. ठाकूर, उपअभियंता एन. पी. घुमरे, सहायक अभियंता देवरे, चांदेकर, शिनकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अण्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)