शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, खापराळेकरांनी वेशीतच रोखले ‘कोरोना’ला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : शहरासह तालुक्यातील १२५ गावांपैकी केवळ चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाला ग्रामस्थांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : शहरासह तालुक्यातील १२५ गावांपैकी केवळ चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाला ग्रामस्थांनी ‘एंट्री’ दिलेली नाही. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे केलेले पालन आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात या दोन गावांना यश मिळाले आहे.

गेल्या वर्षी सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर वर्षभरात टप्प्याटप्प्याने सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. मात्र, सिन्नरपासून पश्चिमेला सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर व खापराळे या दोन गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. चंद्रपूर आणि खापराळे गावांमध्ये ग्रामस्थांनी घेतलेली काळजी आणि पाळलेले नियम उल्लेखनीय आहे.

चंद्रपूरची लोकसंख्या ६१०, तर खापराळे गावाची लोकसंख्या ४०५ आहे. या दोन्ही गावांमधील अंतर एक किलोमीटर असून, चंद्रपूर-खापराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असून, दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. गावात दोन दूध संकलन केंद्रे आहेत. ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाविषयी जनजागृती करण्यासह आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांकडून विशेष खबरदारी घेऊन घरोघरी सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येते. जनजागृतीवरही विशेष भर देण्यात आला आहे. दोन्ही गावे डोंगराळ प्रदेशात असून, ग्रामस्थांचे सिन्नरला येणे-जाणे आहे. या गावातील नागरिक पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या महानगरांसोबत जास्त संपर्कात नाहीत. त्यामुळे या गावांत मुंबई-पुण्यातून येणारे कोणीही नाही. ग्रामस्थांना घरपोहोच किराणाचे ‘अ‍ॅप’ दिले आहे. गावातील काही ग्रामस्थ याचा वापर करत असल्याची माहिती सरपंच अशोक सदगीर यांनी दिली.

गावात आतापर्यंत झालेले विवाह हे शासनाच्या नियमाप्रमाणे अतिशय मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडल्याचे सरपंच अशोक सदगीर यांनी सांगितले. दूध व्यवसायानिमित्त ग्रामस्थांची सिन्नरला ये-जा असली, तरी नागरिक मास्कचा वापर करतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात अद्याप चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सणासुदीला बाहेरगावातील नातेवाईक या गावात येऊन गेले; मात्र नियमांचे पालन प्रामाणिकपणे केल्याने सुदैवाने कोणीही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

कोट...

चंद्रपूर-खापराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सहकार्य केले. विवाह सोहळे अतिशय मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत उरकले. मास्कचा वापर केला. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बाहेरगावी ये-जा करताना काळजी घेतली. त्यामुळे गावात कोरोनाला येऊ दिले नाही.

- अशोक सदगीर, सरपंच, चंद्रपूर-खापराळे

कोट...

ग्रामस्थांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. जनजागृतीवर विशेष भर दिला. दुग्ध व्यवसाय करणारे व भाजीपाला विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. ‘माझे कुटंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी केली.

- जे. एस. साखरे, ग्रामविकास अधिकारी, चंद्रपूर-खापराळे

फोटो- ०५ अशोक सदगीर, सरपंच ०५ जे. एस. साखरे, ग्रामविकास अधिकारी

===Photopath===

050421\241605nsk_21_05042021_13.jpg~050421\241605nsk_22_05042021_13.jpg

===Caption===

अशोक सदगीर~जे. एस. साखरे