शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुकणेच्या सरपंचपदी चंद्रभागा साबळे बिनविरोध : उपसरपंचपदी दीपाली चोरडिया

By admin | Updated: August 9, 2014 00:48 IST

मुकणेच्या सरपंचपदी चंद्रभागा साबळे बिनविरोध : उपसरपंचपदी दीपाली चोरडिया

घोटी : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी चंद्रभागाबाई प्रकाश साबळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी दीपाली मदन चोरडिया यांची निवड करण्यात आली. शिवसेनाप्रणीत किसान सेनेचे तालुकाप्रमुख मदन चोरिडया यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती गणपत राव, माजी सरपंच विष्णू राव यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनलने आठ जागा मिळवून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच - उपसरपंचपदाची शुक्रवारी निवड घेण्यात आली. सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित असल्याने चंद्रभागाबाई प्रकाश साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदासाठी निवड प्रक्रिया गुप्तमतदानाने घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी कु. दीपाली मदन चोरडिया, प्रभाकर आवारी व सविता राव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात माघारीच्या प्रक्रि येत सविता राव यांनी माघार घेतल्याने दीपाली चोरडिया व प्रभाकर आवारी यांच्यात लढत झाली. यात दीपाली चोरडिया हीस आठ मते पडली तर प्रभाकर आवारी यांना अवघ्या तीन मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे कु. दीपाली चोरडिया यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून पी. एन. बिबवे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक उत्तम शेटे यांनी सहकार्य केले. या विशेष बैठकीस ग्रामपंचायत सदस्य हिरामण राव, चंद्रभागा राव, प्रभाकर आवारी, मंदा बोराडे, योगीता बोराडे, भास्कर राव, सविता राव, किशोर उबाळे काळू मुकणे आदि उपस्थित होते. दरम्यान ही निवड जाहीर होताच अष्टविनायक पॅनल समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्याच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी किसन सेनाप्रमुख मदन चोरडिया यांच्यासह माजी सभापती गणपत राव, माजी सरपंच विष्णू राव, प्रकाश साबळे, शांताराम उबाळे, पोपट राव, भगवान वेल्हाळ, राजाभाऊ राव, मोहन बोराडे, नीलेश चोरडिया, शांताराम उबाळे, किशोर साबळे, रवि साबळे आदि उपस्थित होते.