शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाने चांदवडला पुरस्कार

By admin | Updated: April 21, 2017 01:05 IST

चांदवड : तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेंतर्गतचे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक लोकसहभागाचे चीज असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले

 चांदवड : तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेंतर्गतचे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक लोकसहभागाचे चीज असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले. शिरुर येथे जलयुक्त शिवारच्या १५ गावांचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.जनतेने कामे चांगली व दर्जेदार करून घ्यावीत. तलाव, पाझरतलाव, बंधारे यांच्यातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढल्यानेच चांदवड तालुक्यात एप्रिलपर्यंत पाणी टिकले. टॅँकरमुक्ती झाली आहे. शिरुरसारख्या छोट्याशा गावाने जर मागेल त्याला शेततळे या योजने भाग घेतला, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यास त्यांना शेततळ्यासाठी जेसीबी व इतर खर्चासाठी २० टक्क्यांपर्यंत आगाऊ रक्कम दिली जाईल, असे जागेवरच आदेश देऊन या गावात पूर्वी १९ शेततळे मंजूर झाली अजून २५ शेततळे लगेच देऊ, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले. या शेततळ्यात कागद टाकण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी जागेवरच प्लॅस्टिक कागदासाठी कर्जपुरवठा केला जाईल. या शेतकऱ्यांना विनाव्याजी हे कर्जपुरवठा जिल्हा विकास योजनेमार्फत पुरवू असे जाहीर करून या भागातील ३०० विहिरीपैकी १०० विहिरीचे पुनर्भरणाचे काम करावे. त्यांनाही महाराष्ट्र रोजगार हमी कार्यक्रमातून अनुदान दिले जाईल. त्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड व बॅँकेचे पासबुक असावे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जाहीर केले.व्यासपीठावर कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक तुकाराम जगताप, जिल्हा कृषी अधिकारी कानोडे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक विजय हाके, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, कविता धाकराव, डॉ. सयाजीरावगायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शेलार, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, अशोक भोसले, गटविकास अधिकारी पुष्पा पांडे, सरपंच अलका जाधव, उपसरपंच शिवाजी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी अधिकारी विजय पवार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रांताधिकारी भीमराज दराडे, आभार तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी मानले. यावेळी सरपंच अलका गांगुर्डे, मधुकर जाधव, नंदू जोंधळे यांनी गावाच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमास आर्ट आॅफ लिव्हिंगचे अशोक गवळी, संजय खैरनार, अनिस म्हसराणी, विकास भुजार्डे, मनोज शिंदे, बाळासाहेब ठाकरे, नंदू जोंधळे, राहुल जाधव, देवीदास अहेर, के.बी. जंगम, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, वर्धमान पांडे, संजय गुरव, नितीन फंगाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, वनविभागाचे सोनवणे, बी. पी. खंगरे, अ‍ॅड. पवनकुमार जाधव, नंदू जोधंळे, शिवाजी जाधव, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)