शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 18:47 IST

जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक ; ब्रिटीशकाळापासुंची परंपरा

जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवात पहिल्या दिवशी जायखेडा पोलीस ठाण्यातील चाँदशहावलीबाबांच्या दरग्यापासून ते जुन्या इंग्रजी शाळेतील चाँदशहावलीबाबाच्या पुरातन दरग्यापर्यंत ढोल ताश्या व बँड पथकांच्या तालावर संदल मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत जायखेडा व परिसरातील सर्व जाती धर्मांच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. संदल मिरवणूक संपल्यानंतर हिंदू-मुस्लीम धर्मातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पुढारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते दरग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात येऊन विधीवत पूजा करण्यात आली.या वेळी सरपंच शांताराम अिहरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य, उरूस उत्सव कमेटीचे संजय बच्छाव, शफीक कादरी, देविदास पाटील, दत्तात्रेय अहिरे, भास्कर अहिरे, सुशील गुरव, तुषार मोरे, लक्ष्मण सोनवणे, विजय बच्छाव, राजेश सावळे, निकेश कोळी, गोरख गर्दे, शिवाजी गुंजाळ, मंगेश राऊत, भालचंद्र नेरकर, इस्माईल शहा आदींसह पोलीस कार्मचारी, उरूस उत्सव समितीचे सदस्य, तसेच जायखेडा व पंचक्र ोशीतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.दुसºया दिवशी दर्गा परिसरात यात्रा उत्सव संपन्न झाला. यावेळी हिंदू मुस्लिम भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सिरणी व साखर फुटणे अर्पण करून शेकडो भाविक येथे नतमस्तक झाले. रात्री मनोरंजनसाठी सोपान कोळी डोनगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्र म पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला.तिसºया दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी जिल्ह्यातील अनेक नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. विजयी मल्लांसाठी विविध वस्तूंबरोबरच रोख रकमेची अनेक बक्षिसे देण्यात आली. उरूस उत्सवाच्या यशस्वितेसाठी चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव कमेटी, गावातील विविध सामाजिक संस्था व विविध मंडळाचे कार्यकर्ते, जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कार्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.