शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

By admin | Updated: January 17, 2016 00:50 IST

जिल्ह्यात दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

येवला : नाशिक जिल्ह्यात सोमवार, दि.१८ व १९ जानेवारी या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने शेतकऱ्यांनी जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी काळजी घेऊन, पूर्वतयारी करण्याचे आवाहन येवला तहसीलदार शरद मंडलिक यांनी केले आहे. हवामान खात्याने जिल्हाधिकारी यांना याबाबतची सूचना केल्यानंतर येवला तहसीलदारांना याबाबत सुचित करण्यात आले आहे. याबाबत भ्रमणध्वनीवरून तहसीलदार यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हवामान खात्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्याबाबत कळविले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शेतातील उत्पादित माल सुरक्षित ठिकाणी हलवावा. सध्या शेतकऱ्यांचा कांदा शेतशिवारात उघडा पडला आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय अन्य सुरक्षित उपाययोजनादेखील करावी. वातावरणाच्या बदलानुसार घराबाहेर पडावे किंवा नाही याचा अंदाज घ्यावा असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. दुपारपासून व्हॉट्सअ‍ॅपवर वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज आहे याबाबत संदेश फिरत होते. या संदेशाची विश्वासार्हता पडताळून पाहण्यासाठी लोकमतने थेट येवला तहसीलदार शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.