शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

नियुक्त संचालक मंडळाची शक्यता धूसर

By admin | Updated: November 23, 2015 23:32 IST

दादा भुसे : सटाणा, नामपूर बाजार समित्या

सटाणा : बहुचर्चित सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येऊन सात महिने उलटले; मात्र अजूनही इच्छुकांना प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीची प्रतीक्षा आहे. याबाबत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी अखेर प्रशासकीय संचालकांची दिवसेंदिवस यादीच लांबलचक होत असल्याचे सांगून पेचप्रसंग निर्माण झाल्याची कबुली देत एकप्रकारे संचालक मंडळ नियुक्तीची शक्यता फेटाळून लावली आहे.बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील एका कार्यक्रमात सहकार राज्य मंत्री दादा भुसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातच टेंभे (खालचे) येथील सरपंच भाऊसाहेब अहिरे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्र म सोडून थेट मंत्रिमहोदयांना टार्गेट करत बाजार समित्यांचे विभाजन झाले.प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीचे काय, असा सवाल उपस्थित केला. यावेळी भुसे यांची चांगलीच अडचण झाली आणि नियुक्त संचालक मंडळासंदर्भात प्रथमच जाहीर वक्तव्य करण्याची त्यांच्यावर वेळ आली. भुसे म्हणाले की, सटाणा आणि नामपूर या स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्यानंतर प्रशासक कामकाज पाहत आहेत. नियुक्त संचालक मंडळासाठी शासनस्तरावर हालचालीही सुरू झाल्या मात्र संचालकांची रोज यादी वाढतच चालली आहे. आता यादी एवढी मोठी झाली की निवड कोणाची करावी, असा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट करत भुसे यांनी नाराजांना सांभाळताना पेचप्रसंगाला कोण सामोरे जाईल, असा प्रतिसवाल करत एकप्रकारे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीची शक्यता त्यांनी सपशेल फेटाळून लावली. खासदार सुभाष भामरे, रामचंद्रबापू पाटील, राघो अहिरे, संजय चव्हाण यांनी बाजार समितीच्या विभाजनासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात सटाणा आणि नामपूर या दोन्ही स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या. त्यानंतर अनेक इच्छुकांनी संचालक मंडळावर वर्णी लावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांना सभापती, उपसभापती आणि संचालक पदाचे डोहाळे लागले मात्र सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नियुक्त संचालक मंडळाची शक्यता फेटाळल्याने इच्छुकांचे एकप्रकारे स्वप्नच भंगले आहे. (वार्ताहर)