शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना नवख्यांचेही आव्हान

By admin | Updated: February 18, 2017 00:06 IST

काँटे की टक्कर : प्रभाग ३१ मध्ये मतविभागणीचा बसेल फटका

साहेबराव अहिरे : पाथर्डीप्रभाग क्रमांक ३१ मध्ये असलेले पारंपरिक उमेदवार आणि अपक्षांचा नवा चेहरा यामुळे येथील प्रभागात चुरस निर्माण झाली आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे समीकरण बदलत असल्याने मतविभागाचा फायदा कुणाला होतो यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.  सुरु वातीस सर्वच जागांवर दुरंगी लढत होईल, असे वाटत असताना आता मात्र सर्व चारही जागांवर लढती होतील हे चित्र आहे. पुरुष सर्वसाधारण जागेवर पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्येच लढत वाटत होती. आता मात्र काहीसी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी लढतीच्या निकालाची अनिश्चितता अधोरेखित केली आहे. मुख्य लढत मात्र भाजपा शिवसेनेतच होणार आहे.  पुरु ष सर्वसाधारण जागेवर (ड गट) गेल्यावेळी मुख्य स्पर्धक शिवसेनेचे माजी उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे आणि भाजपाचे सुदाम कोंबडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. डेमसे शिवसेनेचे एकनिष्ठ, गेल्यावेळच्या अल्पशा मतांनी झालेल्या पराभवाच्या सहानुभूतीच्या लाटेवर, पाथर्डीकरांच्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर ते विजयाचे गणित मांडत आहेत. दुसरीकडे मनसेतून भाजपात गेलेल्या सुदाम कोंबडे यांना त्यांचे पारंपरिक मते आणि भाजपाच्या मतांचा आधार लाभला आहे. असे असले तरी नगरसेवक कोंबडे यांना चुरशीची लढत लढावी लागणारआहे. याशिवाय याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकृष्ण वारुंगसे आणि मनसेकडून भाऊसाहेब तुंगार आरपीआयचे शंकर भदरंगे मैदानात उतरले आहेत. भाजपाचे नाराज संजय गायकवाड व अपक्ष समीर निमोणकर यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने ते फाइट देतात की निकालच बदलवतात हा प्रभागात चर्चेचा विषय आहे.  महिला सर्वसाधारण (क गट) जागेवरदेखील तिरंगी अन् काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार अनिता डेमसे सेनेच्या मतांना सुरूंग लावू शकतात. भाजपाच्या नेहा म्हैसपूरकर यांचे शिवसेनेच्या संगीता जाधव व मनसेच्या अर्चना जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले अमोल जाधव यांच्या पत्नी असलेल्या संगीता जाधव यांची उमेदवारी अमोल जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. मनसेच्या अर्चना जाधव यांनी केलेल्या कामावर दावेदारी केलीआहे.  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब गट) येथेही भाजपाच्या पुष्पा आव्हाड आणि शिवसेनेच्या जयश्री जाधव यांच्यासमोर अपक्ष शुक्रवंती वसंत पाटील, मनसेचे कार्यकर्ते अजय दहिया यांच्या मातोश्री सुमन खेतमल दहिया यांच्यामुळे ही लढत चौरंगी होताना दिसते. मीना गांगुर्डे यांची भाजपाने दखल न घेतल्याने त्या काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. त्यांचा प्रभावही अडचणीचा ठरू शकतो. अनुसूचित जाती राखीव (अ गट) जागेवर शिवसेनेच्या वंदना बिरारी, भाजपाचे भगवान दोंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कोथमिरे यांच्यात लढत होऊ शकते. याच जागेवर मनसेकडून ज्योती गायकवाड, बसपाच्या शारदा दोंदे शिवसेनेवर नाराज होऊन अपक्ष उमेदवारी करीत असलेल्या शोभा दोंदे, भाकपाचे अमर चंद्रमारे आणि अपक्ष हेमंत गायकवाड हेही रिंगणात आहेत. तुल्यबल उमेदवारांमुळे सर्वच गटांत कोणत्याही एका पॅनलच्या सर्वच उमेदवारांना एकतर्फी मतदान होण्याची शक्यता अजिबातच नाही.