शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:42 IST

अवयवदानासाठी अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील दोन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

नाशिक : अवयवदानासाठी अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील दोन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकारामुळे अवयवदानाच्या नावाखाली मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली असून, अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.मयत महिलेचे पती अश्विन जामदार यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर अवयवदानातील सदर प्रकार समोर आला. या साºया प्रकाराबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले, दि. २४ आॅगस्ट रोजी जया जामदार या महिलेचा कॉलेजरोडवर अपघात झाला होता. सदर महिलेच्या मेंदूला मार लागल्याने तिला जवळच्याच विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचारानंतर सदर महिलेची प्रकृती खालावली. यावेळी रुग्णालयातील डॉ. संजीव देसाई यांनी सदर महिलेला बे्रनडेड घोषित केले. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आल्याची माहिती आहे.एका डॉक्टरला अशा प्रकारे रुग्णाला ब्रेनडेड घोषित करता येत नाही. त्यासाठी कमिटी असते. नाशिक शहरात ऋषिकेश हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल, अपोलो आणि वोक्हार्ट या चारच रुग्णालयांना अवयवदानासाठी परवानगी आहे. त्यानुसार विजन हॉस्पिटलमधून सदर महिलेला साईबाबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, याठिकाणी कमिटीने महिला ब्रेनडेड नसल्याचे स्पष्ट केले. अवयवदान करायचे असेल तर सदर रुग्णालयाकडून उपचाराचा खर्च नातेवाइकांकडून घेतला जात नाही. महिला ब्रेनडेड नसल्याने साईबाबा हॉस्पिटलने महिलेच्या नातेवाइकांकडून उपचाराच्या खर्चाची मागणी केली आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेचा फॉर्मही भरून घेतला.त्यानंतर ऋषिकेश हॉस्पिटलची कमिटी बोलावून महिलेला ऋषिकेशमध्ये हलविण्यात आले. दि. २९ आॅगस्ट रोजी सदर महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यावेळी मुंबईतून झोनल कमिटीनेही येत माहिती घेतली. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने एक पथक तयार करत संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांसह कर्मचाºयांचे जबाब घेतले. मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने विजन आणि साईबाबा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून आलेला खुलासा शासनाच्या झोनल कमिटीकडे पाठविला जाणार असल्याचेही डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले. या प्रकाराने मात्र अवयवदानाच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यात मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांत अवयवदानासंबंधी मोठ्या प्रमाणावर जागृती केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक मयत रुग्णांच्या नातेवाइकांकडून मृत व्यक्तींच्या अवयवांचे दान करण्यास संमती दिली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात अवयवदानाच्या काही घटना घडल्या आहेत. अवयवदानाच्या या संकल्पनेचे सर्वत्र स्वागतही केले जात आहे. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरीडोर उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, अवयवदानाच्या नावाखाली गैरप्रकार होत असेल तर पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासनापुढे सदर रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.