शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांंच्या आवाहनाला प्रशासनाकडूनच ‘आव्हान’

By admin | Updated: November 27, 2015 23:51 IST

नोकर भरतीतील आर्थिक आमिषाची तक्रार

नाशिक : जिल्हा परिषदेत ७२ पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, काही उमेदवारांना नोकरीच्या आमिषाने आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी नोकरभरती पारदर्शक व नियमानुसार होणार असल्याचे आवाहन करीत नोकरीसाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.नोकरभरतीत ठरावीक पदाधिकारी व सदस्यांना अमुक जागांचा ‘कोटा’ ठरविण्यात आला असून, त्यानुसार ही नोकरभरती होत आहे. त्यासाठी एकेका जागेसाठी ‘लाख मोलाची’ बोली लावली जात असून, याबाबत काही उमेदवारांकडून आर्थिक मागणीही करण्यात आल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी जिल्हा परिषदेची नोकरभरती ही शासन नियम-निकषानुसार व गुणवत्तेवरच होणार असून, त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले होते. उपराज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच असे आवाहन करण्याची वेळ आल्याने नोकरभरतीत काळेबेरे होत असल्याच्या चर्चेला एकप्रकारे दुजोरा मिळालेला असताना आणि अशा प्रकारे जर कोणी आर्थिक निकषाच्या बळावर नोकरीचे आमिष दाखवित असेल तर या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत त्याबाबत किमान प्राथमिक पातळीवर तरी चौकशी करून अहवाल मागविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रशासनाने नोकरभरती ही शासन नियमानुसार व पारदर्शकपणे होत असून त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही आणि त्याबाबत कोणीही तक्रार केलेली नसल्याचे सांगत एकप्रकारे अध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखविल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे. (प्रतिनिधी)