शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘एनजीटी’च्या अटी शिथिल होण्यासाठी खतप्रकल्पाचा अडसर

By admin | Updated: August 30, 2016 02:01 IST

महापालिका : स्थायीवर खासगीकरणाचा प्रस्ताव

नाशिक : ज्या खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरवत राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानग्यांना रोख लावला आणि महापालिकेचे नाक दाबले, त्या खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. स्थायीच्या निर्णयावरच एनजीटीच्या अटींचे शिथिलीकरण निर्भर असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी म्हटले आहे.राष्ट्रीय हरित लवादाने खतप्रकल्पाच्या दुरवस्थेबद्दल महापालिकेला जबाबदार धरत शहरातील बांधकाम परवानग्यांना रोख लावला होता. त्यानंतर काही अटी-शर्तींवर बांधकाम परवानग्या देण्यास संमती देण्यात आली, परंतु अटी-शर्ती पूर्ण करणे कोणत्याही विकसकाला शक्य होत नसल्याने गेल्या दहा महिन्यांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे. एनजीटीच्या निर्णयाची झळ शासकीय योजनांनाही पोहोचली असून, म्हाडा तसेच मनपाच्या घरकुल योजनेलाही पूर्णत्वाचे दाखले प्राप्त करण्यात अडचणी उद्भवत आहेत. एनजीटीच्या निर्णयाने निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आता पुढाकार घेतला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांच्याच कारकीर्दीत तयार झालेला खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्याची तयारी केली आहे. खतप्रकल्पाचा प्रश्न सुटल्याशिवाय एनजीटीकडे महापालिकेला आपली बाजू सक्षमपणे मांडता येणार नाही, हे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीही ओळखले असून, त्यासाठीच खतप्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीवर ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थायी समितीच्या निर्णयावरच एनजीटीच्या अटी शिथिलीकरणाचा मुद्दा निकाली निघणार आहे. त्यामुळे स्थायीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.