लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : गोव्याचे मुख्यमंत्री नातेवाईक असल्याचे सांगून व स्वत: लष्करात नोकरीला असल्याची बतावणी करून तब्बल १४ बेरोजगारांना लाखो रूपयांना गंडा घालणारी महिला संशयित रूपाली शिरूरे ही फरार झाल्याने तिचा शोध घेण्यासाठी आव्हान म्हसरूळ पोलिसांसमोर आहे. दिंडोरीरोड परिसरात राहणाऱ्या सोपान ठाकरे या बेरोजगार युवकासह अन्य बेरोजगारांना गोवा राज्यात खाणीत अभियंता म्हणून नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली म्हसरूळ गजपंथ परिसरात राहणाऱ्या शिरूरे नामक महिलेने तब्बल १४ बेरोजगार युवकांची फसवणूक करून सुमारे १४ लाख २० हजार रूपयांना गंडा घातल्याची घटना दोन दिवसांपुर्वी उघडकीस आली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी दिंडोरीरोड परिसरात राहणाऱ्या सोपान ठाकरे याने म्हसरूळ पोलिसांत तक्रार दिली होती.
‘तोतया’ महिलेस शोधण्याचे आव्हान
By admin | Updated: May 19, 2017 16:16 IST