शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात बंडोबांना थंड करण्याचे आव्हान

By admin | Updated: February 10, 2017 23:10 IST

सिन्नर तालुक्यात बंडोबांना थंड करण्याचे आव्हान

 शैलेश कर्पे सिन्नरजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना व भाजपा यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे या पक्षांकडून अनेकांनी अर्ज दाखल केले. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने सदर इच्छुकांना अपक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहेत. येत्या सोमवारी माघार असून, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान आजी-माजी आमदारांसमोर उभे ठाकले आहे. राज्यात भाजपा-सेना युतीत ज्या पद्धतीने विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे त्याच धर्तीवर सिन्नरचे राजकारण सुरु आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे शिवसेनेची तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे भाजपाच्या प्रचाराची सूत्रे आहेत. उमेदवारी देण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यासह त्यांना निवडून आणण्यासाठी उभय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारी देतांना वाजे व कोकाटे या दोघांनाही आपआपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची मोठी कसरत करावी लागली. आता उमेदवाऱ्या जवळपास निश्चित झाल्या आहेत. मात्र पक्षाकडून इच्छुक म्हणून दाखल केलेले अर्ज आता अपक्ष म्हणून गणले गेले आहेत. या अपक्ष असलेल्या उमेदवारांच्या माघारीसाठी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गटात किंवा गणात बंडखोरी झाल्यास पक्षाचा अधिकृत उमेदवार धोक्यात येण्याची भीती उभय पक्षाच्या नेत्यांना नक्कीच भेडसावत आहे. पंचायत समितीच्या बारा जागांसाठी तब्बल ११०, तर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ५४ उमेदवारी अर्ज आहेत. माघारीसाठी सोमवार (दि. १३) सकाळी ११ ते ३ असा केवळ चार तासांचा अवधी आहे. त्यामुळे या कालावधीत बंडखोरांची किंवा नाराजांची माघार होणे गरजेचे असणार आहे.आपल्या कार्यकर्त्यांनी माघार घ्यावी व पक्षाच्या अधिकृत उमेदवारास धोका निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना व भाजपा यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नाराज इच्छुकांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे.