शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी रोखण्याचे सर्वच पक्षांपुढे आव्हान

By admin | Updated: February 12, 2017 00:17 IST

जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेना, राष्ट्रवादीत अधिक संख्या

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वच राजकीय पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. यातील किती बंडखोर सोमवारी (दि.१३) माघार घेतात, यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या सर्वच पक्षांपुढे बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात बंडखोरांची संख्या जास्तच आहे. शिवसेनेचा विचार केला तर नाशिक तालुक्यातील पळसे व एकलहरे गटात उमेदवारी नाकारल्याने तालुकाप्रमुखासह अनेकांनी बंडाचे निशाण फडकविले होते. मात्र पळसे व एकलहरे गटातून बहुतांश उमेदवारांना शांत करण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना यश आलेले असले तरी, काही नाराजांची समजूत काढण्यासाठी थेट मातोश्रीला वाद मिटविण्याची भूमिका घ्यावी लागली आहे. तरीही एकलहरे गटातून शंकर धनवटे शिवसेना उमेदवाराच्या विरोधात अपक्ष लढण्याचे चित्र आहे. निफाड तालुकाप्रमख उत्तम गडाख यांनाही तिकीट नाकारल्याने त्यांनीही अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तीच बाब नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गटातून शिवसेनेकडून ऐनवेळी प्रवेशकर्ते झालेल्या विजया अहेर यांना उमेदवारी मिळाल्याने पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांच्या पत्नी गायश्री शशिकांत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीकडून जायखेडा गटातून उमेदवारी न मिळालेले बागलाण तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उभे केल्याने त्यांचे तालुकाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील देवगाव गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य हरिश्चंद्र भवर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता पवार यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली आहे. येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या मुलाला शाहूराजे शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीची तयारी केली होती. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर ते माघारी फिरणार असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)