शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अतिक्रमणविरोधी कारवाईला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:35 IST

महानगरपालिका प्रशासनाने सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय हटविण्यासाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक संतप्त झाले असून, त्यांनी शनिवारी (दि. २४) इदगाह मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिक्रमण विरोधी कारवाईला आव्हान दिले आहे.

नाशिक : महानगरपालिका प्रशासनाने सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय हटविण्यासाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक संतप्त झाले असून, त्यांनी शनिवारी (दि. २४) इदगाह मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिक्रमण विरोधी कारवाईला आव्हान दिले आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची संभाव्य कारवाई लक्षात घेऊन सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांनी काळ्याफिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवितांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिसराचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली आहे. चुंचाळे शिवारातील सर्व्हे नंबर ४४० आणि ४४३ मध्ये अनधिकृत भंगार व्यवसाय, अनधिकृत बांधकामे वाढत गेल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाने २०१७ मध्ये पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र व्यावसायिकांनी परत अतिक्रमण केल्याने पुन्हा अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेने ठिकठिकाणी फलक लावून बेकायदेशीर व्यवसाय, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करू नये, असे सूचित केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष करून या जागेवर पुन्हा विनापरवाना अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे दिसून येत असल्याने महापालिका प्रशासनाचे या अतिक्रमाणांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडली. ईदगाह मैदान येथून सुरू झालेल्या मोर्चाचे आंबेडकर पुतळा येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी अब्बास अली खान, अब्दुल रहिम बशीर शेख, रफिक सय्यद, राजू सय्यद, रमजान खान पठाण, हरप्रित सिंग यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यावसायिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नाशिक ट्रेडस असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.सोमवारपासूनची मोहीम स्थगित?सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार दुकानांची अतिक्रमणे येत्या सोमवारपासून हटविण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी गणेशोत्सवामुळे पोलीस बंदोबस्त देण्यास नकार दिला. त्यामुळे सोमवारपासून (दि. २६) राबविण्यात येणारी मोहीम स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. याठिकाणी सुमारे ६५० दुकाने असून, त्यातील २३० दुकानांचा वापरात बदल असल्याने ते सील करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मनपा आयुक्तांनी कारवाईसाठी सात पथकेही तयार केली होती.राजकीय दबावातून कारवाईचाआरोपमहानगरपालिका प्रशासनाकडून एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांनी केला आहे. या भागात प्रदूषण निर्माण होईल किंवा सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचात्रास होईल, असा परिसरात कोणताही व्यवसाय सुरू नसल्याचा दावाही असोसिएशनने निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय