शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी शेतकऱ्याच्या बॅँकेत चकरा

By admin | Updated: February 18, 2017 00:36 IST

नोटाबंदी : धनादेश वटत नसल्याने औषधोपचारासाठीही पैसे नाहीत

येवला : नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य अजूनही अडचणीत असून, राबराब राबून पिकविलेला शेतमाल विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला धनादेशाने मिळतो. मात्र, महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही धनादेश वटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.  तालुक्यातील अंतरवेली येथील शेतकरी राजेंद्र खोडके यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करून मिळालेला धनादेश बँक आॅफ महाराष्ट्रच्या येथील शाखेत दि. १३ जानेवारी रोजी जमा केला आहे. मात्र, एक महिना उलटूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. खोडके यांना डोकेदुखीचा त्रास असल्याने नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.  लासलगाव येथे संबंधित बँकेला विचारले असता तुमचा धनादेश अद्यापपावेतो इकडे पोहोचलाच नाही, असे उत्तर मिळते तर संबंधित व्यापारी आम्ही तुम्हांला धनादेश दिला, आमचे काम संपले. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा, असे सांगितले जाते. त्यामुळे या शेतकऱ्याला औषधोपचार करणे मुस्कील झाले आहे.  येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकल्यानंतर त्याचा धनादेश एक महिना पुढील तारखेचा मिळतो. म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकरी आपला माल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस नेत आहेत. तेथील व्यापारी माल विक्र ी केल्यानंतर त्याच तारखेचा धनादेश देत असल्याने शेतकऱ्याची सोय होते. कांदा विक्रीचे धनादेश लासलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे न देता मुद्दामहून सहकारी बँकांचे दिले जातात. त्या सहकारी बँकेची शाखा ज्या गावात आहे, त्या गावात धनादेश जमा केल्यानंतर रक्कम दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा होते. मात्र, येवला येथील कोणत्याही बँक शाखेत धनादेश जमा केल्यानंतर महिना उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत.  परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळाचा सामना सुरू आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. पिकेही जोमदार आली. उत्पादन चांगले निघाले. शेतमाल बाजार समितीत विक्री होण्याच्या वेळेसच नोटाबंदीचे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. नोटाबंदीने शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. उत्पादन खर्च निघेल असेही भाव मिळेना. निवडणूक प्रचारात उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शेतकऱ्यांना साथ देण्यात येईल, अशा वल्गना करणाऱ्या शासनाने फक्त व्यापाऱ्यांना साथ दिली  आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतमाल विक्रीची रक्कम व्यापाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. (वार्ताहर)