शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती

By admin | Updated: December 14, 2015 00:15 IST

यामिनी जोशी : राष्ट्रसेविका समितीतर्फे युवती संमेलन; जिल्ह्यातील ७५० युवतींचा सहभाग

नाशिक : मुलींकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनमुळे पालकांच्या काळजीत भर पडली आहे़ या अतिकाळजीपोटी पालक सतत छायेप्रमाणे आपल्या मुलींसोबत असतात़ मात्र पालकांची ही मानसिकताच मुलींना परावलंबित्वाकडे घेऊन चालली आहे़ मुलींना व्यावहारीक शिक्षणाबरोबरच पुढे जाण्यासाठी आत्मशक्तीची आवश्यकता असून, ती जागृत करण्याचे काम आता पालकांना करावे लागणार आहे़ कारण, आत्मशक्ती जागृत झालेल्या युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती आहेत, असे प्रतिपादन परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले़के़टी़एच़एम. महाविद्यालयात राष्ट्रसेविका समिती व स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या वतीने संघटनेच्या सहस्त्रचंद्रदर्शन पर्वाच्या निमित्ताने एकदिवसीय युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून जोशी बोलत होत्या़ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सद्यस्थितीत मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावहारिक शिक्षण अत्यंत गरजेचे आहे़ योगविद्या धामच्या मानद प्राचार्य आशा वेरूळकर यांनी मार्गदर्शन करताना युवतींनी ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला़राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य मंजिरी कोल्हटकर यांनी आजच्या तरुणींनी स्वकेंद्रितपणातून बाहेर काढून ‘स्व’त्वाची जाणीव करून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे़या संमेलनाचा समारोप ‘समितीचे ८० वर्षांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाने झाला़ यामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इमानदार यांनी तरुणींना मार्गदर्शन केले तसेच वर्षभर अशा प्रकारची संमेलने घेण्याचा मनोदय व्यक्त केला़ या संमेलनात जिल्ह्यातील सुमारे ७५० युवतींनी सहभाग घेतला होता़ संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसेविका समिती व राणी लक्ष्मी स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)